आयुष्यात कोणतीही गोष्ट करताना आपण अशा अनेक चुका करतो ज्याचा आपल्या नंतर पश्चाताप होतो. बरेचदा हातात घेतले काम करताना आपल्या मनात सतत नकारात्मक विचार येतात. अशावेळी व्यक्तीचे वाईट विचार त्याला पुढे जाण्यापासून रोखतात. ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास कमी होतो.
जया किशोरी म्हणतात की, यश (Success) मिळवणे ही मोठी गोष्ट नाही. पण यश टिकवणे ही गोष्ट सगळ्यात आधी आणि महत्त्वाची आहे. तुम्ही कितीही ठिकाणं बदलली असतील तर वाईट सवयी बदलल्याशिवाय तुम्ही दु:खीच राहाल. तुम्ही ज्या गोष्टी गमावलाय त्या गोष्टी विसरुन हवे ते मिळवण्यासाठी कार्य करा. जाणून घेऊया जया किशोरीच्या या गोष्टी लक्षात ठेवाच, आयुष्य जगण्यासाठी सुकर होईल.
जर तुम्हाला प्रेम दाखवायचे असेल तर आधी त्या व्यक्तीवर प्रेम करायला शिका. तसेच तुमच्या भीतीवर नियंत्रण ठेवा. जीवन हा असा खेळ आहे. ज्या ठिकाणी आपल्या संयमाने आणि धैर्याने काम करावे लागते.
जया किशोरी म्हणतात, कोणतीही गोष्ट करताना आपल्याला आपल्या वाईट सवयी सोडून देणं महत्त्वाचं आहे. वाईट सवयींमुळे (Habits) आपण आयुष्यात कधीही पुढे जाऊ शकत नाही. यासाठी तुमच्या वाईट सवयी ओळखा. त्यावर मात कशी करता येईल हे ठरवा.
आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर ध्येय ठरवा. तुमचे लक्ष्य साधण्यासाठी तुम्हाला त्याचे व्यवस्थित आणि परिपूर्ण पद्धतीने नियोजन करणे कधीही गरजेचे आहे. त्यासाठी तुम्हाला अधिक मेहनत देखील घ्यावी लागेल. तेव्हा तुम्हाला यशप्राप्ती होऊन आयुष्य मार्गी लागेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.