Relationship Tips: तुमच्या पार्टनरचं बॉस किंवा सहकाऱ्यावर मन जडलंय? या ६ टीप्स फॉलो करा, सर्व सत्य येईल समोर

Relationship Tips: लग्नानंतर दुस-यासोबत अफेअर ठेवणे एक गुन्हाच आहे. कारण आपण एखाद्या व्यक्तीचा विश्वासघात करत असतो. विवाहबाह्य संबंध ठेवणारे बहुतेक पार्टनर सापडतात पण, ते कधीच आपली चूक कबूलही करत नाहीत. आपल्या पार्टनरचे आपल्या कार्यालयातील सहकाऱ्यांशी किंवा त्यांच्या बॉसशी अफेअर आहे हे लगेच ओळखण्यासाठी त्यांच्या काही गोष्टीवर लक्ष ठेवणं आवश्यक आहे.
Relationship Tips: तुमच्या पार्टनरचं बॉस किंवा सहकाऱ्यावर मन जडलंय? या ६ टीप्स फॉलो करा, सर्व सत्य येईल समोर
Relationship Tips
Published On

लग्नानंतर आपला साथीदार सोडून दुसऱ्या एखाद्या व्यक्तीसोबत संबंध ठेवणं हा सर्वात मोठा गुन्हा आहे. विवाहबाह्य संबंधामुळे हसत खेळतं नात्यात कटुता येत असते. नवरा-बायकोमध्ये सतत वाद होत असतात. अनेकजण हा गुन्हा करताना सापडल्यानंतरही ते त्यांची चुकी मान्य करत नाहीत. सध्या अनेकाचं आपल्या ऑफिसमधील बॉस आणि सहकाऱ्याशी संबंध असतात. तुमचा पार्टनर हा एखाद्या सहकाऱ्याच्या प्रेमात आहे हे ओळखायचं असेल तर काही गोष्टींकडे लक्ष ठेवणं आवश्यक आहे. त्या गोष्टी कोणत्या आहेत, ते आपण जाणून घेऊ .

रात्री उशिरापर्यंत ऑफिसमध्ये असणं

काम असणे चांगले आहे. कॉन्फरन्स आणि मिटींग्स​​पर्यंत ठीक आहे. जर हे वेळोवेळी होऊ लागले तर समजून घ्या की ते काहीतरी काळंबेरं आहे . याबाबत विचारलं तर ते छोट्या छोट्या गोष्टींवर लांबलचक स्पष्टीकरण देत असतील तर काहीतरी लपवले जात असल्याचे लक्षण असतं.

वेळ देणं

काही लोकांसोबत अनेकदा अनपेक्षित गोष्टी घडतात, जसे की अचानक मीटिंग चुकणे, अचानक ट्रेन चुकणे किंवा अचानक सहलीचे प्लॅनिंग करणे. पण ट्रॅफिकमुळे वेळेवर येता आले नाही, असं कोणी नेहमी नेहमी सांगत असेल तर सतर्क व्हा. बहुतेकवेळा तुमचा पार्टनर शरीराने तुमच्यासोबत असतो परंतु मनाने नसतो. सतत फोनवर उपलब्ध राहत असेल तर तुमचा पार्टनरचं दुसऱ्यासोबत अफेअर चालू आहे हे समजून घ्या. जर तुमचा पार्टनर वारंवार फक्त एकाच व्यक्तीसोबत त्याच्या कामाबद्दल बोलत असेल तर हे लक्षणदेखील विवाहबाह्य संबंधात अडकल्याचं लक्षण आहे.

सतर्क होणे

पार्टनरच्या छोट्या छोट्या कृतीकडे लक्ष द्या. जर तुमचा पार्टनर अचानक त्याच्या कपड्यांबद्दल काळजी करू लागला. घरातून बाहेर पडताना आरशात स्वत: ला पाहत असेल तर समजून घ्या, त्याच्या मनात काहीतरी काळबेरं आहे.

जर पार्टनरला त्याच्या धकाधकीच्या कामाची मजा वाटू लागली असेल. उत्साहाची पातळी दुप्पट झाली असेल, तर हा उत्साह त्याच्या कामाचे नाही तर सहकारी कर्मचाऱ्यांसोबत वेळ घालवण्याचे लक्षण असू शकते. नोकरी आणि कंपनीबद्दल अचानक प्रेम देखील वाढलं असेल तर तुमच्या पार्टनरच्या आयुष्यात दुसरं कोणी तर आलं असावं.

Relationship Tips: तुमच्या पार्टनरचं बॉस किंवा सहकाऱ्यावर मन जडलंय? या ६ टीप्स फॉलो करा, सर्व सत्य येईल समोर
Relationship Tips: पार्टनर लग्नासाठी तयार आहे की नाही? 'या' ७ संकेतावरुन समजेल त्याच्या मनातली गोष्ट

जर तुमच्या पार्टनरला एखाद्या विशिष्ट सहकाऱ्याबद्दल काळजी वाटू लागली असेल. तर हे देखील तुमच्या पार्टनरचं आणि त्या व्यक्तीमध्ये नातेसंबंध निर्माण होण्याचं लक्षण आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही त्या मैत्रिणीबद्दल बोललात तर पती लगेच तिच्याबद्दल काळजी करू लागत असेल तर तो तिच्याबद्दल बोलू लागतो.

Relationship Tips: तुमच्या पार्टनरचं बॉस किंवा सहकाऱ्यावर मन जडलंय? या ६ टीप्स फॉलो करा, सर्व सत्य येईल समोर
Relationship Tips : सकाळी उठल्यावर पार्टनरला 'या' पद्धतीने बोला गुड मॉर्निंग; संपूर्ण दिवस जाईल आनंदी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com