अनेक महिलांच्या डोक्यामध्ये कोंडा झालेला पाहायला मिळतो. अशातच कोंड्याचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, अनेक व्यक्तिंना डोक्यामध्ये खाज येणे अशा प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. परंतु सतत डोकं खाजवत राहणे हे आपल्यासाठी लाजिरवाणे बनून जाते.
केसांची व्यवस्थीत निगा राखली नाही की, केस (Hair) गळणे, डल होणे, खाज येणे अशा स्मस्स्या उद्भवतात. सोबतच अनेक प्रकारचे केमिकल्स प्रॉडक्ट वापरून केस खराब होतात आणि डोक्यामध्ये खाज येणे, केस गळणे, केस ड्राय होणे अशा प्रकारच्या समस्या उद्भवतात. जर तुम्हाला डँड्रफ फ्री (Free) केस हवी असतील तर, आम्ही सांगितलेला घरगुती उपाय तुमच्या फायद्याचा ठरू शकतो.
एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार डोक्यामध्ये सतत होणाऱ्या खाजेवर दही चांगल्या प्रकारे काम करू शकते. दह्याच्या वापर केल्याने डोक्यामध्ये येणाऱ्या खाजेला थांबवले जाऊ शकते. सोबतच केसांना दही लावल्याने केसांची चमक वाढवून केस मजबूत बनतात. यासाठी तुम्हाला आठवड्यातून दोन वेळा केसांना दही लावून मसाज करायचा आहे. हा नियम नियमित फॉलो केल्याने तुमच्या डोक्यामध्ये येणारी खाज दूर होण्यास लवकर मदत होईल.
कोरफडीच्या वापरामुळे केसांमध्ये असलेल्या समस्या दूर होण्यास मदत मिळते. अशातच डोक्यामध्ये येणाऱ्या खाजेवर एलोवेरा जेल उत्तम काम करू शकते. तुमच्या डोक्यामध्ये सतत खाज येत असेल तर, एलोवेरा जेलने तुमच्या केसांना मसाज द्या. मसाज झाल्यानंतर काही वेळाने केस शाम्पूने वॉश करून घ्या.
एक्सपर्टचे असे म्हणणे आहे की, डोक्याची खाज दूर करण्यासाठी तुम्ही ऑलिव्ह ऑइलचा वापर करू शकता. केसांच्या मुळापर्यंत ऑलिव्ह ऑइल लावून झाल्यानंतर कमीत कमी एका तासानंतर डोके स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. ऑलिव्ह ऑइलच्या वापराने डोक्यामधील खाज आणि कोंडा दूर होऊन, केस लांब आणि घनदाट बनतील. त्यामुळे तुम्हाला आठवड्यातून दोन वेळा या रेमेडीचा वापर करायचा आहे.
लिंबू मधील अँटीसेप्टिक गुण डोक्याची खाज घालवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. यासाठी तुम्हाला लिंबूच्या रसामध्ये काळीमिरी पूड आणि कच्चे दूध मिसळून एक मिश्रण तयार करून घ्यायचे आहे. अंघोळीच्या अर्धा तास आधी तुम्हाला हे मिश्रण केसांवरती लावून ठेवायचे आहे. त्यानंतर केस स्वच्छ पाण्याने धुऊन काढायची आहेत. असं केल्याने खाजेसोबत डँड्रफची समस्या देखील दूर होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.