Itchy & Dry Skin : सतत तुमची त्वचा होते कोरडी ? असू शकतो 'हा' गंभीर आजार

आपल्याला वाटते की, त्वचेशी संबंधित इन्फेक्शन, त्वचेचा रंग बदलणे, सतत त्वचेला खाज सुटणे यामुळे कोरड्या त्वचेचा सामना करावा लागतो.
Itchy & Dry Skin
Itchy & Dry SkinSaam TV
Published On

Itchy & Dry Skin : पावसाळ्यात सतत सर्दी किंवा अॅलर्जीमुळे आपल्या त्वचेला खाज सुटते व त्यामुळे त्वचा कोरडा पडतो. परंतु, आपण या समस्येचा सतत सामना करत असू तर आपल्याला गंभीर आजाराशी सामना करावा लागू शकतो.

जर आपल्याला वाटते की, त्वचेशी संबंधित इन्फेक्शन, त्वचेचा रंग बदलणे, सतत त्वचेला खाज सुटणे यामुळे कोरड्या त्वचेचा सामना करावा लागतो. तसेच याचा संबंध मधुमेह, किडनीचे आजार, थायरॉईड किंवा मानसिक आरोग्याशी (Health) संबंधित समस्यांचे लक्षण असू शकते. कधी कधी आपल्याला याचे गंभीर संकेत देखील मिळतात, जाणून घेऊया त्याबद्दल

त्वचेच्या अनेक आजारांचा सामना प्रत्येकाला करावा लागतो. परंतु ही समस्या २ ते ३ दिवसांपेक्षा अधिक काळ दिसू लागली की, लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. यामुळे आपले कोणत्याही कामात लक्ष लागत नाही. सतत येणाऱ्या खाजेमुळे व कोरडेपणामुळे आपल्याला ताण येतो.

Itchy & Dry Skin
Makeup Mistakes : सावधान ! मेकअप करताय तर या गोष्टी लक्षात ठेवा अन्यथा त्वचेला सुटू शकते खाज

या समस्येचे काही सामान्य लक्षणे दिसून येतात. त्वचेवर (Skin) लागणारी खाज, हात, ओटीपोट, घोट्यावर आणि अगदी खाजगी भागांमध्ये खडबडीत आणि कोरडे ठिपके दिसू शकतात. या स्थितीत त्वचेवर खाज सुटल्यास किंवा कोरड्या त्वचेच्या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास त्वचेला तडे जाऊ शकतात आणि त्यामध्ये बॅक्टेरिया वाढू शकतात.

कोरड्या त्वचेचे मुख्य कारण -

१. त्वचेचे इन्फेक्शन -

तज्ज्ञांचे असे मत आहे की, त्वचा जेव्हा कोरडी होते तेव्हा आपल्याला अधिक खाज येऊ लागते. या समस्येवर लवकर लक्ष न दिल्यास आपली त्वचा अधिक कोरडी व वृध्द दिसू लागते. तसेत बॅक्टेरिया व त्वचेची रंग बदलू शकतो.

२. जुनाट रोग -

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की थायरॉईड, मधुमेह, किडनी किंवा लिव्हरशी संबंधित समस्यांमुळेही त्वचा कोरडी होऊ लागते. तज्ज्ञ असेही म्हणतात की, खूप जास्त माफक प्रमाणात धूम्रपान केल्याने त्वचेला खाज सुटते आणि कोरडेपणाची समस्या देखील उद्भवू शकते.

३. मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या-

Itchy & Dry Skin
Monsoon Care Tips : तुमच्या नखांमध्ये घाण साचते? नखांजवळ मृत त्वचा निर्माण होते ? पावसाळ्यात नखांची काळजी कशी घ्याल ? जाणून घ्या

चिंता, ऑब्सेसिव्ह-कंपल्सिव्ह डिसऑर्डर (ओसीडी) आणि नैराश्यामुळे त्वचेत कोरडेपणा आणि खाजेची समस्या भेडसावू शकते. कधीकधी मल्टिपल स्क्लेरोसिससारखे मज्जातंतूचे विकार, पिंच्ड नर्व्ह आणि दाद (हर्पीस झोस्टर) मुळे कोरड्या त्वचेची समस्या देखील भेडसावते.

४. वृद्धत्व आणि जीन्स-

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, त्वचा कोरडी होणे आणि खाज सुटण्याचे एक कारण म्हणजे वृद्धत्व. वयाच्या २५ वर्षांनंतरच या समस्येचा सामना केला जाऊ शकतो. त्वचेत कोरडेपणा आणि खाज येण्याची समस्या हवामान किंवा ठिकाण बदलल्यामुळे देखील होऊ शकते.

खाज सुटणाऱ्या आणि कोरड्या त्वचेला तोंड देण्यासाठी टिप्स

- कोरड्या त्वचेची समस्या टाळण्यासाठी, आंघोळीची वेळ कमी करणे महत्वाचे आहे.

Itchy & Dry Skin
Banana Peel Benefits : चेहऱ्याचा रंग उजवळण्यासाठी फायदेशीर ठरेल केळीचे साल !

- जास्त वेळ आंघोळ केल्याने त्वचा कोरडी होते तसेच, त्वचेतील नैसर्गिक तेलही संपुष्टात येऊ लागते.

- कोरड्या त्वचेच्या समस्येला तोंड देण्यासाठी पेट्रोलियम जेली तुम्हाला खूप मदत करू शकते. पेट्रोलियम जेली नेहमी सोबत ठेवण्याचा प्रयत्न करा.

- जेव्हा तुम्हाला तुमची त्वचा कोरडी वाटेल तेव्हा लगेच पेट्रोलियम जेली वापरा.

- अंघोळीनंतर आपले शरीर चांगले धुवा आणि मॉइश्चरायझर वापरा. यामुळे तुमच्या त्वचेचा ओलावा टिकून राहील.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com