Monsoon Care Tips
Monsoon Care Tips Saam Tv

Monsoon Care Tips : तुमच्या नखांमध्ये घाण साचते? नखांजवळ मृत त्वचा निर्माण होते ? पावसाळ्यात नखांची काळजी कशी घ्याल ? जाणून घ्या

पावसाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्याल ?
Published on

Monsoon Care Tips : पावसाळा आला की, आपल्यापैकी बऱ्याच जणांना तो आवडतो. पावसाळा सुरु झाल्यानंतर अनेक आजारांना आपण बळी पडतो.

पावसाळ्यात संसर्गजन्य आजारांबरोबरच आपल्या त्वचेचे व नखांचे विकार घडतात. पावसाळ्यात घाणीचे पाणी व पावासाच्या पाण्यामुळे आपल्याला हे आजार होतात.

बुरशीजन्य आणि बॅक्टेरियाचे संक्रमण आपल्या नखांसह त्वचेवर परिणाम करत असल्याचे दिसून येते. त्याचा परिणाम आपल्या नखांत घाण साचून ते खराब होतात काही वेळा याचा परिणाम आपल्या आरोग्यावर सुद्धा जाणवू लागतो. अशावेळी आपली नखे संसर्गमुक्त ठेवायची आहेत तर या टिप्स फॉलो करा. (Monsoon Care Tips In Marathi)

पावसाळ्यात आपली नखे निरोगी आणि संसर्गमुक्त ठेवायची आहेत? हे करुन पहा

१. नखे ट्रिम करा व लहान ठेवा -

आपल्या नखांमध्ये घाणेरड्या प्रकारच्या बॅक्टेरियाच्या संसर्गाला आमंत्रणा द्यायचे नसेल, तर त्यांना चांगल्या दर्जाच्या नखांचे क्लिपरने नियमितपणे ट्रिम करायला विसरु नका. क्रोम कोटेड नेल क्लिपर्स टाळा कारण ते गंजतात व त्यामुळे संसर्ग वाढतो.

२. पाय आणि पायाची नखे कोरडी ठेवा -

पावसाळ्यातील घाणेरड्या पाण्यात पाय आणि पायाची नखं सर्वात जास्त येतात. हे त्यांना नुकसान आणि ठिसूळपणासाठी अधिक असुरक्षित बनवते. घाण साचल्याने त्यांच्या आजूबाजूला मृत त्वचा तयार होते. हे सर्व टाळण्यासाठी योग्य चप्पलांची निवड करणे गरजेचे आहे. बंद चामड्याच्या शूजऐवजी उघडे शूज किंवा सँडलचा वापर करा. ते काढून टाकल्यानंतर, पाय आणि नखे कोरड्या करा. बुरशीविरोधी असणे हा पावसाळ्यातील स्वच्छतेच्या आवश्यक गोष्टींचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. संक्रमण टाळण्यासाठी दिवसातून एकदा तरी ते आपल्या पायाच्या नखांभोवती लावले आहे की, नाही याची खात्री करा.

Monsoon Care Tips
Fitness Tips after 60 : वयाची ६० वी ओलांडल्यानंतर आरोग्य निरोगी कसे ठेवाल ?

३. काळजीपूर्वक नेलपेंट करा -

बहुतेक मुलींना नेल पेंट वापरायला आवडते. पावसाळ्यात (Monsoon) नेल पेंट्स वापरण्यात काहीच गैर नाही. फक्त रसायनमुक्त आणि पर्यावरणास अनुकूल नेलपेट वापरण्याचा प्रयत्न करा. आपण नेल कलर रिमूव्हर निवडत असतानाही, नखांच्या आरोग्यासाठी शक्य असल्यास जीवनसत्त्व ए, सी आणि ई असलेले निवडा.

४. पाय कोमट पाण्यात भिजवा -

कोमट पाण्याने (Water) हात व पाय धुतल्याने ते मऊ आणि गुळगुळीत होतात. हे अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल म्हणूनही काम करते. यामुळे नखात असलेली घाण निघून जाण्यास मदत होते.

५. आरोग्यदायी आहार -

पावसाळ्यातच नव्हे तर रोज निरोगी खाणे खूप महत्वाचे आहे. पावसाळ्यात आपण आहारात जीवनसत्त्व ई आणि ओमेगा ३ सारख्या आरोग्य पूरक पदार्थांचा समावेश करू शकतो. तसेच, आपल्या आहारात प्रथिनांचे चांगले संतुलन राखण्याची शिफारस केली जाते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com