Parenting Tips : तुमचे मुलही पहिल्यांदाच सहलीला जातेय? 'या' 4 सेफ्टी टिप्स नक्की शिकवा

Child Care Tips : तुमचे मुल पहिल्यांदा स्कूल ट्रीपला जात असेल तर, त्याला काही गोष्टी सांगणे आणि समजावणे तुमच्या मुलांसाठी सेफ्टीचे असेल.
Parenting Tips
Parenting TipsSaam Tv

Parenting Tips : अनेक मुलं त्यांच्या पालकांसोबत बाहेर फिरायला जाण्याचा प्लान करतात. अशातच अनेक आई-वडील आपल्या मुलांकडे प्रवासादरम्यान लक्ष देण्यासाठी विसरत नाहीत. असाल तर आज अनेक वेळा शाळेतर्फे मुलांना ट्रीपला घेऊन जातात.

अशावेळी तुमचे मुल पहिल्यांदा स्कूल ट्रीपला जात असेल तर, त्याला काही गोष्टी सांगणे आणि समजावणे तुमच्या मुलांसाठी सेफ्टीचे असेल.

Parenting Tips
Parenting Tips : मुलांना होतात 'या' 3 प्रकारच्या एलर्जी, कोणत्या त्या जाणून घ्या

पालकांना (Parents) लहान मुलांना शाळेतील सहलीला एकटे पाठवणे सोपे वाटत नाही. अशावेळी पालकांना सतत आपल्या मुलांची (Kids) काळजी लागलेली असते. सहलीच्या वेळी लहान मुलांची सेफ्टी अत्यंत गरजेची असते. म्हणूनच आम्ही तुम्हाला आज तुम्हाला काही ट्रॅव्हल टीप्स सांगणार आहोत. जेणेकरून तुम्ही तुमच्या मुलांना एकटे असताना सुरक्षित कसे राहायला पाहिजे हे शिकवू शकता.

1. शाळेमधून माहिती काढा :

लहान मुलांना शाळेमधील सहलीला पाठवण्याआधी शाळेमधून माहिती घेण्यासाठी अजिबात विसरू नका. सोबतच सहलीचे लोकेशन आणि सोबत कोणकोणते टीचर आणि गार्डस जाणार आहेत याची पडताळणी करा. सोबतच मुलांच्या सेफ्टी आणि हेल्थशी निगडित गोष्टींबद्दल माहिती जाणून घ्या. सोबतच शाळेमधील (School) इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर घ्यायला विसरू नका.

2. लहान मुलांना हेल्थ टिप्स द्या :

शाळेतील सहलीला जाण्याआधी लहान मुलांना स्वतःच्या आरोग्याची काळजी कशा पद्धतीने घ्यावी याचा सल्ला द्या. प्रवासादरम्यान हायजिन रिलेटेड गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याने तुमची मुले आजारी पडू शकतात. त्यामुळे तुमच्या मुलांना वेळेवर अंघोळ आणि जेवणाआधी सॅनिटायझरचा वापर करायला सांगा. सोबतच लहान मुलांच्या बॅगमध्ये हायजिन रिलेटेड गोष्टी द्या.

3. शिक्षकांची परवानगी घ्या :

शाळेतील सहलीला जाण्यासाठी लहान मुलांचे पालक त्यांच्यासोबत नसतात. अशावेळी लहान मुलांना कोणतेही काम करण्याआधी शिक्षकांची परवानगी घेण्याचा सल्ला द्या. खरंतर प्रवासामध्ये लहान मुलं रात्रीच्या वेळी बाहेर फिरायला जातात. परंतु असे करणे लहान मुलांसाठी रिस्की टास्क ठरू शकतो. त्यामुळे सहलीला पाठवण्याआधी लहान मुलांकडून शिक्षकांना विचारल्याशिवाय कोणतीही गोष्ट करणार नाही असे प्रॉमिस घ्या.

Parenting Tips
Parenting Tips : मुलांमध्ये असणारी 'ही' 5 लक्षणे ठरु शकतात त्रासदायक, वेळीच लक्ष द्या अन्यथा पश्चातापाची वेळ येईल !

4. स्ट्रेंजरच्या अधिक जवळ जाण्यापासून थांबवा :

शाळेतील सहली दरम्यान लहान मुले नवीन नवीन लोकांना भेटतात. अशावेळी लहान मुले अनोळखी व्यक्तींबरोबर लवकर मिक्स होतात. अशावेळी तुम्ही तुमच्या मुलांना अनोळखी व्यक्तींपासून लांब राहण्याचा सल्ला द्या. सोबतच अनोळखी व्यक्तीला पर्सनल माहिती शेअर करू नये असा देखील त्यांना द्या. जेणेकरून तुमची मुले स्वतःला पूर्णपणे सुरक्षित ठेवू शकतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com