Parenting Tips : मुलांना होतात 'या' 3 प्रकारच्या एलर्जी, कोणत्या त्या जाणून घ्या

Child Care Tips : एलर्जीच्या समस्या जास्ती प्रमाणत वाढल्यास त्वरित डॉक्टरांना दाखवणे गरजेचे आहे.
Parenting Tips
Parenting TipsSaam Tv
Published On

Cause of Seasonal skin food allergy : लहान मुलं नाजुक असते. त्यामुळे त्यांना नेहमीच एलर्जीच्या समस्येने जखडलेले असते त्याचे कारण म्हणजे त्यांची रोगप्रतिकारकशक्ती कमजोर असते.अशा वेळेस त्याच्याकडे लक्ष देऊन रोगप्रतिकारकशक्ती वाढेल असा आहार देणे गरजेचे असते.

एलर्जीच्या समस्या जास्त प्रमाणत वाढल्यास त्वरित डॉक्टरांना दाखवणे गरजेचे आहे. पण त्या आधी जाणून घ्या कोणत्या तीन प्रकारच्या एलर्जी आहेत जे मुलांना होतात.

Parenting Tips
Child Care Tips : तुमचे मुलंही झोपेत अंथरुण ओले करते ? मग 'हे' घरगुती उपाय करुन पाहा

1. त्वचेची (Skin) एलर्जी

लहान मुलांना अनेक वेळा त्वचेची एलर्जी होते. त्यात मुलांना पुरळ उठणे,त्वचा लाल होणे,खाज सुटणे,हाताच्या मानगटावर आणि कानाच्या मागे पुरळ उठणे इत्यादी त्रास मुलांना होतो. धातूंच्या आणि एखाद्या फुलाच्या किंवा वनस्पतीला स्पर्श केल्याने होते तसेच काही वेळेस मुलांना फॅब्रिकची एलर्जी होऊ शकते.

2. मोसमी किंवा श्वसनसंबधित एलर्जी

सध्या बऱ्याच मुलांना (Child) श्वसनसंबधित एलर्जी होते. हा त्रास मुले धुळीच्या संपर्कात आल्याने होते. त्यात घसा खवखवणे, शिंक येणे नाकातून पाणी येणे, वारंवार खोकला,कधीकधी श्वास घेण्यास त्रास,डोळ्यात पाणी येणे असा त्रास मुलांना होता.अशा समस्या भविष्यात उद्भवू नये म्हणून डॉक्टरांना भेटून वेळीच उपचार घ्या.

3. यापासून बचाव कसा करायचा

मुलांना जर अंगावर खाज सुटत असेल तर त्यांना कोमट पाण्याने आंघोळ घाला.जास्ती उबदार कपडे न घलता सुत्ती कपडण्याचा वापर करा. मुलांना त्वचेचा संबधित एलर्जी होऊन जर पुरळ किंवा मुरूम आल्यास त्यावर बर्फाने शेका. त्रास जर जास्तीच वाढला तर डॉक्टरांकडे घेऊन जा.

Parenting Tips
Travelling With Kids : लहान मुलांसोबत फिरायला जाताय ? 'हे' पदार्थ अवश्य सोबत ठेवा

4. मुलांमध्ये फूड एलर्जी

लहान मुलं कधीकधी फूड एलर्जीचा शिकार होतात. या एलर्जी मध्ये त्यांना पोटदुखी, अस्वस्थता,उलट्या आणि जुलाब सुरू होतात. तोंडावर सूज येणे किंवा श्वास घेण्यास त्रास होतो हा त्रास टाळण्यासाठी डॉक्टरांना भेट द्या.

5. फूड एलर्जीचे कारण काय आहेत

काही ड्राय फ्रूटस, नटस,अंडी,मासे यामुळे मुलांना फूड (Food) एलर्जी होते तर कधी कधी एलर्जी दुधामुळे देखील होते पण पालकांना ते समजून येत नाही. फूड एलर्जीचे लक्षणे वारंवार आढल्यास डॉक्टरांकडे जाऊन तपासणे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com