Parenting Tips : मुलांमध्ये असणारी 'ही' 5 लक्षणे ठरु शकतात त्रासदायक, वेळीच लक्ष द्या अन्यथा पश्चातापाची वेळ येईल !

Child-Parents Bond : पालक मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी रात्रंदिवस मेहनत करण्यात व्यस्त असतात.पण त्यासोबतच मुलांकडे लक्ष देणे देखील तितकेच गरजेचे आहे
Parenting Tips : मुलांमध्ये असणारी 'ही' 5 लक्षणे ठरु शकतात त्रासदायक, वेळीच लक्ष द्या अन्यथा पश्चातापाची वेळ येईल !
Published On

आत्ताच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे पालकांना मुलांकडे लक्ष देण्यासाठी अजिबात वेळ नाही. खरंतर पालक मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी रात्रंदिवस मेहनत करण्यात व्यस्त असतात.पण त्यासोबतच मुलांकडे लक्ष देणे देखील तितकेच गरजेचे आहे.

मुलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वेळ काढणे महत्वाचे आहे. मुलं त्याच्या समस्या स्वतः सोडवतात असे पालकांना वाटते.मात्र मुलांना नेहमी पालकांच्या इमोशनल बॉन्डिंगची कमी जाणवत असते.

Parenting Tips : मुलांमध्ये असणारी 'ही' 5 लक्षणे ठरु शकतात त्रासदायक, वेळीच लक्ष द्या अन्यथा पश्चातापाची वेळ येईल !
Travelling With Kids : लहान मुलांसोबत फिरायला जाताय ? 'हे' पदार्थ अवश्य सोबत ठेवा

1. मुलांचे शांत होण

मुलं जेवत असताना किंवा खेळत असताना शांतपणे बसले असेल तर याचा अर्थ मुलांना काही समस्या आहे ज्यामुळे त्यांना मानसिक त्रास (Mental Health) होत आहे. या लक्षणांमुळे मुलांमध्ये तणावाची स्थिती निर्माण होते परिणामी हे त्यांच्या मानसिक आजाराचे (Disease) कारण ठरू शकते. त्यामुळे या परिस्थितीत मुलांसोबत अधिक वेळ घालवा त्यांना एकटे सोडू नका.

2. अधिक रडणे

काही मुले इंट्रोवर्ट असतात ते मोकळेपणाने कधीच बोलत नाही आणि त्यामुळे लहान लहान गोष्टीवर लगेच रिऑक्ट करतात.ते सध्या गोष्टी मनाला लावून घेतात आणि रडतात म्हणजेच त्यांना पालकांची गरज आहे.मुलांकडे जर लक्ष दिले नाही तर तुमच्या गोष्टीवर सुद्धा ओव्हर रिऑक्ट करतात.

Parenting Tips : मुलांमध्ये असणारी 'ही' 5 लक्षणे ठरु शकतात त्रासदायक, वेळीच लक्ष द्या अन्यथा पश्चातापाची वेळ येईल !
Parenting Tips : लहान मुलांचा खराब व्यवहार पालकांसाठी बनतो लाजिरवाणा ? अशावेळी काय कराल ?

3. नकारात्मक गोष्टी बोलणे

अनेक वेळा मुल (Child) तुमचे अटेंशन मिळिण्याकरिता तुम्हाला ज्या गोष्टी आवडत नाही ते बोलतात.त्यामुळे पालकांविषयी मुल नकारात्मक बनते आणि जाणूनबुजून पालकांन समोर वाईट वागतात. अशा वेळेस पालकांनी मुलांवर रागवण्याचे सोडून त्यांना समजून घेणे गरजेचे असते. मुलांना तुमची गरज आहे आणि ते तुमचं अटेंशन मिळावे म्हणून असे वागत असतात.

4. नेहमी जवळ रहा

जर तुमचे मुल तुमच्या आसपास राहायला लागले असेल तर अशा वेळेस नेहमी त्याच्या सोबतच रहा किंवा तुमचे अटेंशन मिळवण्यासाठी मुल प्रयत्न करत असेल तर त्याला तुमची गरज आहे हे तुम्ही समजून घेणे गरजेचे आहे.

5. हट्टी स्वभाव झाला तर

आजकाल जर तुमचे मुल खूप हट्टीपणा करत असेल आणि सतत तुमच्या कामात व्यत्यय आणत असेल, तर समजून जा की मुलाला तुमच्या अटेंशन ची गरज आहे आणि तुम्ही त्याच्यावर प्रेम करावे एकत्र चांगला वेळ घालवावा अशी त्याची इच्छा आहे. ही चिन्हे जाणून तुम्ही मुलाला चांगले वाढवू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com