Money Saving Tips : अनेकदा महिन्याच्या सुरुवातीला आपल्या उत्पन्नाचा मोठा भाग ईएमआय, खोलीचे भाडे, मुलांच्या शाळेची फी इत्यादींवर खर्च होतो. अशा स्थितीत महिनाभराचा खर्च भागवणे ही मोठी समस्या आहे. जर त्यात घरात एकच व्यक्ती कमावती असेल तर तारेवरची कसरत असते. यात पगारातील सर्वाधिक खर्च होतो.
अशा परिस्थितीत, आज आम्ही तुम्हाला बचतीच्या काही उत्तम टिप्स सांगणार आहोत, ज्याचा अवलंब केल्यानंतर तुम्ही दर महिन्याला खूप बचत करू शकाल. तुमचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी तुम्ही बचतीचे हे पैसे चांगल्या ठिकाणी गुंतवू शकता.
पैसे वाचवण्याचे हे स्मार्ट मार्ग तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहेत. हे पैसे वाचवून, तुम्ही भविष्यात स्वतःसाठी मोठ्या प्रमाणात निधी उभारण्यास सक्षम असाल. त्यांच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
1. खर्चासाठी पद्धतशीर धोरण तयार करा
तुम्ही तुमच्या खर्चासाठी पद्धतशीर धोरण तयार केले पाहिजे. खर्चाचा हिशेब तयार करून, तुम्ही तुमचे पैसे कसे आणि कुठे खर्च करावेत हे तुम्हाला सहज कळू शकेल. यासह, तुम्ही तुमचे पैसे अतिशय पद्धतशीरपणे खर्च करू शकाल.
2. फालतू खर्च करणे टाळा
आपल्यापैकी अनेकांना फाजील खर्च करण्याची सवय असते. महिन्याच्या सुरुवातीला अनेक लोक पगाराचे पैसे निरुपयोगी ठिकाणी खर्च करतात. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या अनावश्यक खर्चावर बंधन ठेवावा. तुमचा अनावश्यक खर्च तुम्ही चांगल्या ठिकाणी गुंतवू शकता.
3. पगाराच्या 30 टक्के बचत करा
तुमच्या पगारातील 30 टक्के बचत करण्याचा प्रयत्न करा. हे बचतीचे पैसे तुम्ही FD, म्युच्युअल फंड किंवा कोणत्याही सरकारी बचत योजनांमध्ये गुंतवू शकता. हा पैसा तुमचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी काम करेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.