तुम्ही पिताय ते बाटलीतील पाणी शुद्ध आहे का? संशोधनातून धक्कादायक खुलासा

जगभरातील निम्म्याहून अधिक लोकांना पिण्याच्या स्वच्छ पाण्याअभावी कोणत्या ना कोणत्या समस्येचा सामना करावा लागत असल्याचं समोर आलं आहे. नुकतंच केलेल्या सर्व्हेक्षणामधून ही बाब समोर आली आहे.
drinking water
drinking watergoogle
Published On

पिण्यासाठी स्वच्छ आणि चांगलं पाणी मिळावं, अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र जगभरातील निम्म्याहून अधिक लोकांना पिण्याच्या स्वच्छ पाण्याअभावी कोणत्या ना कोणत्या समस्येचा सामना करावा लागत असल्याचं समोर आलं आहे. नुकतंच एक सर्वेक्षण करण्यात आलं आणि सर्व्हेक्षणातून ही बाब समोर आली आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या व्यक्तींकडून पिण्याचं पाणी किती स्वच्छ आणि सुरक्षित आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.

चॅपल हिलमधील नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटी आणि नॉर्थ कॅरोलिना युनिवर्सिटीतील तज्ज्ञांनी हे सर्व्हेक्षण केलं आहे. नेचर कम्युनिकेशन्स जर्नलमध्ये यासंदर्भातील रिपोर्ट प्रसिद्ध करण्यात आला आहे.

रिपोर्टमध्ये असं नमूद करण्यात आलं आहे की, ज्यावेळी लोकांना नळाच्या पाणी पिण्यायोग्य वाटत नाही तेव्हा ते बाटलीबंद पाणी विकत घेण्याचा निर्णय घेतात. हे पाणी महाग असतं. इतकंच नाही तर लोकं साखरयुक्त पेय पिण्यावर देखील भर देतात, जे आरोग्यासाठी आणि दातांसाठी हानिकारक मानलं जातं.

काय आहे हे सर्व्हेक्षण?

हा सर्वेक्षणाचा रिपोर्ट 2019 मध्ये लॉयड्स रजिस्टर फाउंडेशन वर्ल्ड रिस्क पोल मधील 141 देशांतील 1,48,585 प्रौढ व्यक्तींचा डेटा वापरून तयार करण्यात आला. यामध्ये असं आढळून आलं की, पिण्याच्या पाण्याची भीती झांबियामध्ये सर्वात जास्त आणि सिंगापूरमध्ये सर्वात कमी प्रमाणात दिसून आली.

drinking water
Cloudy Urine Causes : सकाळी लघवीमध्ये फेस दिसला तर सावध व्हा; शरीरातील २ अवयव निकामी होण्याचे संकेत

संशोधकांनी अशा लोकांची ओळख पटवली, ज्यांना पिण्याच्या पाण्यामुळे नुकसान होत होतं. यामध्ये महिला, शहरातील रहिवासी, अधिक शिक्षण असलेले लोक आणि त्यांच्या सध्याच्या उत्पन्नाशी संघर्ष करणाऱ्यांना त्यांच्या पिण्याच्या पाण्यापासून हानी होण्याचा धोका अधिक असल्याचं दिसून आलं.

संशोधकांना नेमकं काय समजलं?

संशोधकांना असं लक्षात आलं की, भ्रष्टाचारामुळे पिण्याच्या पाण्याने होणाऱ्या नुकसानीचा अंदाज सर्वात अचूक होता. संशोधकांना असंही आढळून आलं की, ग्राहकांना त्यांच्या पाणीपुरवठ्यातील धोक्यांचं मूल्यांकन करणं कठीण होतं. अनेक प्रदूषके रंगहीन, गंधहीन आणि चवहीन असतात. त्यामुळे व्यक्ती पिण्याच्या पाण्याच्या धोक्यांचं आकलन करू शकत नाहीत.

संशोधकांनी काय सूचवलं?

संशोधनात असं सुचवण्यात आलंय की, पाण्याची चाचणी करणं शक्य तितकं सोपं असणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे याचा निकाल सोप्या भाषेत समजावून सांगावा लागेल.

drinking water
Red Banana Benefits: हिरवी-पिवळी केळी सोडा आणि लाल केळी खा; आरोग्याला मिळतील भरपूर फायदे!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com