Paper Cup Tea Risk: कागदी कपात चहा पिताय? तर आताच सावध व्हा, मायक्रोप्लास्टिक शरीरात जाण्याचा धोका, तज्ज्ञांचा इशारा

Paper Cup Tea Safety: कागदी कपात गरम चहा घेतल्यास फक्त १५ मिनिटांत हजारो मायक्रोप्लास्टिक कण पेयात मिसळू शकतात. हे कण दीर्घकाळात आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात, असा तज्ज्ञांचा इशारा आहे.
Paper Cup Tea Safety
Paper Cup Tea Riskgoogle
Published On
Summary
  • IT Kharagpur च्या अभ्यासात कागदी कपात दिलेल्या गरम चहातून १५ मिनिटांत २५,००० मायक्रोप्लास्टिक कण मिसळतात असे समोर आले.

  • हे कण दीर्घकाळात कॅन्सर, दाह आणि पचनसंस्थेचे नुकसान करू शकतात, असे तज्ज्ञांचे मत.

  • डॉक्टरांच्या मते कधीतरी कागदी कप चालतात, पण रोज ३-४ वेळा वापरणाऱ्यांनी तत्काळ पर्याय निवडणे आवश्यक.

चहा हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. अनेकांना चहा कमी करायला सांगितल्यावर मोठं संकट आल्यासारखं वाटतं. यात कितीप्रमाण सत्यता आहे पुढील माहितीत जाणून घेऊ. संशोधनात असे आढळले आहे की, कागदी कपात चहा प्यायल्याने तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो. मात्र यामध्ये काही मर्यादा आणि नियम आहेत. याचे पालन करून तुम्ही चहा घेऊ शकता.

IIT खरगपूरच्या अभ्यासानुसार, कागदी कपात फक्त १५ मिनिटं ठेवलेला गरम चहा तब्बल २५ हजार मायक्रोप्लास्टिक कण सोडतो. म्हणजे दिवसातून तीन कप चहा घेतल्यास जवळपास ७५ हजार डोळ्यांना न दिसणारे प्लास्टिकचे कण शरीरात जातात. ही बाब चिंताजनक असल्याचे डॉक्टर आणि पर्यावरण तज्ज्ञांनी सांगितले आहे.

Paper Cup Tea Safety
Eyebrow Growth: आयब्रो वाढतील फक्त ७ दिवसात, महागडे प्रोडक्ट सोडा अन् हा घरगुती उपाय वापरा

अलीकडेच महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी कागदी कपांवर बंदी घालण्याचे निर्देश दिले. त्यांच्या मते, कागदी कप हे कॅन्सरच्या वाढत्या घटनांचे मुळ कारण आहेत. यावरून राज्यभर चर्चा सुरु झाल्या असून तज्ज्ञांनी या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे.

कागदी कपांचा कॅन्सरशी थेट संबंध दिसून आलेला नाही. मात्र या कपांमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक लेयरमध्ये मायक्रोप्लास्टिक आणि PFAS सारखे घातक रसायन असतात. गरम चहा टाकल्यावर हे रसायन पेयामध्ये मिसळतं आणि दीर्घकाळाच्या संपर्कामुळे ते कॅन्सरसारखे अनेक आजारांना कारणीभूत ठरू शकते.

मायक्रोप्लास्टिक कण हे शरीरातील विविध भागांपर्यंत पोहोचू शकतात. ते कॅन्सरजन्य रसायनं वाहून नेतात, पेशींमध्ये दाह निर्माण करतात आणि पचनसंस्थेतील संरक्षक थर कमजोर करतात. हे सर्व घटक पुढे कॅन्सरचा धोका वाढवू शकतात. तज्ज्ञांच्या मते, गरम पेय कागदी कपात दिल्यास त्यातील काही पदार्थ पेयात मिसळण्याची शक्यता असते. हा दीर्घकालीन संपर्क शरीरासाठी धोकादायक ठरू शकतो. तरीही कधीतरी वापरल्यास तितका धोका नसल्याचे डॉक्टर स्पष्ट करतात. मात्र रोज तीन ते चार वेळा कागदी कपातील चहा कॉफी घेणाऱ्यांनी खबरदारी घेण्याची गरज आहे.

Paper Cup Tea Safety
Body Lump Symptoms: शरीरावरील गाठींमधील वेगळेपण कसं ओळखावं? डॉक्टरांनी सोप्या शब्दात सांगितलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com