

कांदा रक्तातील साखर नैसर्गिकरीत्या कमी करण्यात मदत करतो.
कोलेस्ट्रॉल कमी करुन हृदयाचे आरोग्य सुधारण्यास कांदा फायदेशीर.
मेटफॉर्मिनसोबत घेतल्यास कांद्याचा प्रभाव अधिक वाढतो.
टाइप-2 डायबेटीस हा जगभरातला लाखो लोकांना होणारा आजार आहे. यामध्ये शरीरात इन्सुलिनची कमतरता निर्माण झाल्याने रक्तातील साखर सतत वाढलेली राहते. त्यामुळे शुगर नियंत्रणात आणण्यासाठी लोक औषधं, आहार आणि जीवनशैलीतील अनेक बदल करतात. मात्र अलीकडील संशोधनाने असे संकेत दिले आहेत की आपल्या रोजच्या स्वयंपाकघरात वापरला जाणारा साधा कांदा डायबेटीस नियंत्रणात आणण्यासाठी औषधांइतकाच प्रभावी होऊ शकतो.
द एंडोक्राइन सोसायटीच्या 97 व्या वार्षिक परिषदेत सादर करण्यात आलेल्या एका अभ्यासात, मेटफॉर्मिन या डायबेटीसविरोधी औषधाबरोबर कांद्याच्या अर्काचा वापर केल्यावर डायबेटीसच्या रुग्णांच्या शरीरातील रक्तातील साखर जवळपास 50 टक्क्यांपर्यंत कमी झाल्याचे दिसले. इतकेच नाही तर कांद्याच्या अर्कामुळे एकूण कोलेस्ट्रॉलचे प्रमाणही मोठ्या संख्येने कमी झाले. त्यामुळे रोजच्या आहारात कांद्याचा समावेश केल्यास नैसर्गिकरीत्या रक्तातील साखर आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते, असा निष्कर्ष तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
कांद्याचा सेवन रोजच्या आहारात केल्याने रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास, कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि चयापचय प्रक्रियेचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. कमी कॅलरीज असूनही शरीराचे मेटाबॉलिक रेट वाढवण्याची क्षमता कांद्यात असल्याचे संशोधन कळाले आहे. त्यामुळे डायबेटीस रुग्णांसाठी तो सुरक्षित आणि आरोग्यदायी पर्याय ठरू शकतो. कच्चा कांदा सॅलड किंवा सँडविचमध्ये, शिजवलेला कांदा भाज्या, सूप किंवा करीमध्ये तसेच ग्रिल किंवा रोस्ट स्वरूपातही नियमितपणे आहारात सहज समाविष्ट करता येतो. तसेच सॉसेस किंवा डिपमध्ये ब्लेंड करूनही याचे सेवन करता येते.
रक्तातील साखर कमी करण्याबरोबरच कांद्याचा अर्क कोलेस्ट्रॉलही कमी करतो, असेही अभ्यासात दिसून आले. 400 mg/kg आणि 600 mg/kg या उच्च डोसमध्ये याचा सर्वाधिक परिणाम दिसला. रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल—दोन्हीवर होणारा हा प्रभाव, डायबेटीस आणि हृदयाच्या आरोग्याच्या दृष्टीने कांद्याला प्रभावी नैसर्गिक सप्लिमेंट म्हणून पुढे आणतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.