Sakshi Sunil Jadhav
रोजचा दिवस सुखकर जावा असे प्रत्येकालाच वाटत असते. पण जीवनात अडचणी या ठरलेल्याच असतात. आज या अडचणींचा सामना तुम्हाला करावे लागेल.
मनासारखे झाले तर कोणाला आवडणार नाही? आज आपण अनेक ठरवलेल्या गोष्टी तशाच होताना दिसतील. दिवस सुखाला नवीन झालर लावणार आहे. संततीकडून सुवार्ता मिळतील.
घरामध्ये पाहुण्यांची ऊठबस राहील. मुळातच नव्याने वस्तू खरेदी किंवा वाहन खरेदी यासाठी काहीतरी निमित्ताने कुटुंबीय आपण एकत्रित येणार आहात.
बहिणीच्या सुखाने ओतप्रोत भरलेला आजचा दिवस असेल. काही वेळेला कारण नसताना मनाला अस्वस्थ वाटते. आज आपल्याकडून वेगळा पराक्रम याचमुळे घडेल.
पैसे जरी जवळ असले तरी त्याचा योग्य विनियोग होणे हे गरजेचे असते.आज आपल्या राशीला पैसा मिळेल आणि नव्याने गुंतवणुकीसाठी तुम्ही तयार राहाल.
मन फुलपाखरासारखे असेल. इकडे बागडावे तिकडे हुंदडावे असे वाटेल. बौद्धिक गोष्टींमध्ये विशेष रस निर्माण होईल. स्वतःवरच्या प्रेमाने तुम्ही तृप्त होऊन जाल.
बेजबाबदार पणाने कोणत्याही गोष्टी किंवा वक्तव्य आज करू नका. नाहीतर तुमचेच पाय तुमच्या गळ्यात अशी काही अवस्था होईल. खर्चाला मात्र संयम राखणे आज गरजेचे आहे.
शेजारी सहकार्य मिळेल. नव्या जुन्या परिचयामध्ये आपलं कोण परके कोण हे समजण्याचा आजचा दिवस आहे. परदेशी वार्तालाप होतील.
समाजामध्ये एक वेगळी आपली प्रतिमा आहे. या प्रतिमेला तडा जाणार नाही असे वर्तन करणे गरजेचे आहे. आज सामाजिक क्षेत्रात पुढाकार घेतल्यास विशेष सन्मान पदरी पडतील.
लांबच्या प्रवासाला दिवस चांगला आहे. आपली चर असणारी रास. तीर्थक्षेत्री सहज भेटी होतील. शिव उपासना चांगली फलित देणारी ठरेल. काळजी नसावी.
मोठ्या प्रमाणामध्ये पैसा जोडीदाराकडून मिळेल. विशेष सहकार्य जोडीदाराच्या कुटुंबीयांच्या कडून मिळेल. घवघवीत काहीतरी आपल्या नशिबी आज येणार आहे.
संसारामध्ये गोडी गुलाबी ने काम कराल. याचा परिणाम असा होईल कामाच्या क्षेत्रात सुद्धा प्रगती साधाल. कोर्टाच्या कामात विशेष यश मिळेल.