Diwali 2025: दिवाळीच्या दिवशी जुने दिवे पुन्हा लावणं शुभ की अशुभ? जाणून घ्या नियम

Relighting old diyas on Diwali: दिवाळीमध्ये अनेकदा लोक मागील वर्षी वापरलेले मातीचे दिवे (Diya) किंवा जुन्या पितळी समया पुन्हा वापरतात. मात्र, ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार, दिवाळी जुने दिवे लावणे शुभ आहे की अशुभ, याबाबत अनेक नियम आहेत.
Relighting old diyas on Diwali
Relighting old diyas on Diwalisaam tv
Published On
Summary
  • दिवाळीत मातीचे दिवे एकदाच वापरावेत

  • यमदीपकासाठी जुना मातीचा दिवा वापरता येतो

  • धातूचे दिवे स्वच्छ करून पुन्हा वापरता येतात

दिवाळी हा प्रकाशाचा आणि दिव्यांचा सण मानला जातो. अंधारावर प्रकाशाचा विजय, घरात सुख-समृद्धीचे आगमन आणि आनंदाचा उत्सव म्हणून हा सण साजरा करण्यात येतो. या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान गणेश यांची पूजा करण्यात येते. याशिवाय घर दिव्यांच्या प्रकाशाने उजळवलं जातं.

दिवाळीच्या दिवसात अनेकांच्या मनात एक प्रश्न असतो, दिवाळीत मागील वर्षी वापरलेले किंवा पूजेतले जुने मातीचे दिवे पुन्हा वापरणं शुभ आहे का? चला जाणून घेऊया यामागील धार्मिक नियम आणि दीप प्रज्वलनाची योग्य पद्धत काय आहे.

मातीच्या दिव्यांचे काय आहे नियम?

सामान्य पूजेसाठी मातीचे दिवे

सामान्य पूजा किंवा विधी करताना मातीचे दिवे साधारणपणे एकदाच वापरणं शुभ मानलं जातं. कारण मातीचे पात्र एकदा पवित्र कार्यात वापरले की, त्यामध्ये त्या ऊर्जा शोषून घेतात आणि त्यानंतर पुन्हा वापरणं धार्मिकदृष्ट्या योग्य मानलं जात नाही.

दिवाळीच्या मुख्य पूजेसाठी

दिवाळीच्या मुख्य लक्ष्मी पूजेत वापरलेले मातीचे दिवे पुन्हा वापरणं अशुभ मानण्यात येतं. असं मानलं जातं की, पूजे दरम्यान हे दिवे नकारात्मक ऊर्जा शोषून घेतात. त्यामुळे त्यांचा पुन्हा वापर केल्यास घरात नकारात्मकता येऊ शकते.

Relighting old diyas on Diwali
Friday Laxmi remedy: शुक्रवारच्या दिवशी देवी लक्ष्मीचे 'हे' उपाय करा; आर्थिक संकटातून लगेच होईल सुटका

यम दीपक

धनतेरस किंवा नरक चतुर्दशीच्या रात्री यमदेवासाठी जो दीपक लावला जातो, तो मात्र मागील वर्षीचा जुना मातीचा दिवा असू शकतो. हा दिवा मोहरीच्या तेलाने लावला जातो आणि तो यमराजाला अर्पण केला जातो. मान्यता आहे की, हा दिवा अकाल मृत्यूपासून संरक्षण देतो.

चांदी आणि इतर धातूचे दिवे

जर घरात पूजा कक्षात किंवा इतर ठिकाणी पीतळ, चांदी किंवा धातूचे दिवे वापरत असाल तर त्यांना चांगले स्वच्छ धुऊन, पुन्हा अग्नीने शुद्ध करून वापरता येते. असे दिवे पुन्हा प्रज्वलित करणं शुभ मानलं जातं. यामुळे पर्यावरणाचीही काळजी घेतली जाते आणि परंपरेला मानही दिला जातो.

Relighting old diyas on Diwali
Somvar Upay: सोमवारच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात मिसळा 'ही' पांढरी गोष्ट; देवी लक्ष्मी येईल घरात

घरी असलेल्या जुन्या मातीच्या दिव्यांचं काय करावं?

विसर्जन

दिवाळीनंतर मातीचे जुने दिवे एखाद्या पवित्र नदीत विसर्जित करावेत किंवा पिंपळ, तुळस यांसारख्या पवित्र झाडाखाली ठेवावेत. हे धार्मिकदृष्ट्या योग्य मानले जाते.

सजावटीसाठी वापरू शकता

जर तुम्ही विसर्जन करू इच्छित नसाल, तर हे दिवे स्वच्छ करून घराच्या सजावटीत, आर्ट-क्राफ्ट किंवा डेकोरेशनमध्ये वापरू शकता. अशा रीतीने त्यांना नवा उपयोग मिळतो.

Relighting old diyas on Diwali
Goddess Lakshmi : लक्ष्मी प्राप्तीसाठी फक्त खास 10 उपाय करा, तुमच्यावर सदा पैशांची कृपा राहील

दिवाळीत दीपक लावण्याचे महत्त्वाचे नियम

दिशेचे महत्त्व

दिवाळीच्या पुजेदरम्यान वापरण्यात येणारे दिवे नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून लावावेत. घराच्या मुख्य दरवाजावर दिवा लावताना त्याची ज्योत घराच्या आतल्या बाजूस असावी. यमदिवा मात्र नेहमी दक्षिण दिशेला लावला जातो.

Relighting old diyas on Diwali
Diwali 2025: 'या' ६ गोष्टी न घेता दिवाळी पूर्ण नाही! लक्ष्मीची कृपा मिळवण्याचा सोपा मार्ग

किती दिवे लावावेत?

दिवाळीत घरामध्ये लावत असलेल्या दिव्यांची संख्या विषम असावी, जसं ५, ७, ९, ११, २१, ५१, १०८ इ. कितीही दिवे लावू शकता. परंतु विषम संख्या अधिक शुभ मानली जाते.

पहिला दिवा कुठे लावावा?

पूजा सुरू करताना सर्वप्रथम मंदिरात किंवा देवाघरी तुपाचा दिवा लावावा. तुपाचा दिवा मोहरीच्या तेलाच्या दिव्यापेक्षा अधिक पवित्र आणि शुभ मानण्यात येतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com