Somvar Upay: सोमवारच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात मिसळा 'ही' पांढरी गोष्ट; देवी लक्ष्मी येईल घरात

What to mix in bath water on Monday: प्रत्येक व्यक्तीला घरात सुख-समृद्धी आणि धन-संपत्तीची इच्छा असते. यासाठी ज्योतिषशास्त्रात आणि धार्मिक ग्रंथांमध्ये अनेक उपाय सांगितले आहेत. असाच एक सोपा उपाय म्हणजे अंघोळीच्या पाण्यात काही विशिष्ट गोष्टी मिसळणे.
Goddess Lakshmi will come to your house
Goddess Lakshmi will come to your housesaam tv
Published On
Summary
  • सोमवार हा भगवान शंकराचा प्रिय दिवस आहे.

  • शिवलिंगावर जल आणि दूध अर्पण करावे.

  • तांदूळ आणि दूध दान करणे शुभ मानले जाते.

हिंदू धर्मानुसार, सोमवार हा भगवान शंकराचा दिवस मानला जातो. या दिवशी केलेले उपाय तुमच्या जीवनात शांतता, आरोग्य, वैवाहिक आनंद आणि मनोकामना पूर्ण करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जातात. भगवान शंकर हे प्रेम आणि शक्तीचे देव मानले जातात. श्रद्धेने केलेली त्यांची पूजा जीवनात सुख-समृद्धी आणते आणि मृत्यूनंतर मोक्ष प्राप्तीही घडवते, अशी मान्यता आहे.

विशेषतः, ज्यांच्या कुंडलीत चंद्र दुर्बल आहे किंवा ज्यांना मानसिक ताण, कौटुंबिक कलह, अस्वस्थता जाणवत असेल अशा व्यक्तींनी सोमवारच्या दिवशी खास उपाय केले पाहिजेत.

शिवलिंगावर जल अर्पण

प्रत्येक सोमवारी तांब्याच्या लोट्यात गंगाजल किंवा शुद्ध पाणी घ्या. त्यामध्ये कच्चं दूध, साखर, पांढरा चंदन आणि बेलपत्र टाकून शिवलिंगावर अर्पण करा. अर्पण करताना "ॐ नमः शिवाय" मंत्राचा किमान १०८ वेळा जप करा.

दान काय करावं?

चंद्रमा शांततेसाठी तांदूळ आणि दुधाचं दान केलं पाहिजे. संध्याकाळी गरीब व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला तांदूळ, दूध किंवा पांढरे कपडे द्यावेत. हा उपाय चंद्रदोष, मानसिक चिंता आणि अनिद्रा कमी करण्यास मदत करतो.

Goddess Lakshmi will come to your house
Trigrahi Yog: मीन राशीत बनणार त्रिग्रही राजयोग; 'या' राशींचा सुरु होणार गोल्डन टाईम, प्रत्येक कामात मिळणार यश

कोणतं फुलं अर्पण करावं?

सोमवारी शिवपूजेत विशेषतः पांढऱ्या फुलां वापर करावा. त्याचप्रमाणे पांढरं चंदन आणि खीर यांचा भोग अर्पण करावा. शिवांच्या मस्तकावर चंद्र असल्याने पांढऱ्या रंगाशी संबंधित वस्तूंना या दिवशी खास महत्त्व असतं.

अतिरिक्त लाभदायक उपाय

सोमवारी व्रत ठेवा. सकाळी स्नान करून व्रताचा संकल्प करा. दिवसभर फक्त फलाहार घ्या आणि संध्याकाळी शिवचालीसा किंवा शिवकथा वाचा. यासोबत चंद्र आणि शिव मंत्राचा जप करा. मानसिक शांतीसाठी "ॐ सोम सोमाय नमः" किंवा "ॐ चंद्राय नमः" या मंत्रांचा १०८ वेळा जप करावा.

Goddess Lakshmi will come to your house
Surya Gochar: 10 वर्षांनी सूर्य करणार बुध ग्रहाच्या नक्षत्रामध्ये बदल; 'या' 3 राशींचा गोल्डन टाईम होणार सुरु

आंघोळ करताना काय मिसळावं?

सोमवारी दूध किंवा तांदुळासह स्नान करणं शुभ मानलं जातं. एका बादली पाण्यात थोडं कच्चं दूध किंवा तांदूळ टाकून स्नान केल्याने चंद्र शांत होतो आणि मनाला प्रसन्नता मिळते.

Goddess Lakshmi will come to your house
Triekadash Yog 2025: १५ ऑगस्टपासून 'या' राशींचा गोल्डन टाईम होणार सुरु; बुध-मंगळ तयार करणार पॉवरफुल योग

कोणी करावेत हे उपाय?

जर तुम्हाला मनात सतत अस्वस्थता, चिंता जाणवत असेल, वैवाहिक जीवनात तणाव असेल, कामात अडथळे येत असतील किंवा अनिद्रा, राग, मूड स्विंगसारख्या समस्या असतील, तर सोमवारी हे उपाय जरूर करावेत.

Q

सोमवारचा दिवस कोणाला समर्पित आहे?

A

सोमवारचा दिवस भगवान शंकराला समर्पित आहे. या दिवशी केलेली पूजा मनाची शांतता आणि जीवनात सुख-समृद्धी आणते.

Q

सोमवारी शिवलिंगावर कोणती वस्तू अर्पण करावी?

A

तांब्याच्या लोट्यात गंगाजल, कच्चं दूध, साखर, पांढरं चंदन आणि बेलपत्र टाकून शिवलिंगावर अर्पण करावे.

Q

सोमवारी कोणते दान करणे शुभ मानले जाते?

A

तांदूळ, दूध किंवा पांढरे कपडे गरजू व्यक्तीला दान करणे चंद्रदोष आणि मानसिक ताण कमी करण्यास मदत करते.

Q

सोमवारी कोणत्या रंगाची फुले वापरावीत?

A

पांढऱ्या फुलांचा वापर करावा, कारण शिवांच्या मस्तकावर चंद्र आहे आणि पांढरा रंग चंद्राशी संबंधित आहे.

Q

सोमवारी आंघोळीच्या पाण्यात काय मिसळावे?

A

एका बादली पाण्यात थोडं कच्चं दूध किंवा तांदूळ मिसळून स्नान करावे. यामुळे चंद्र शांत होतो आणि मन प्रसन्न होते.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com