काही दिवसातच नवीन वर्षाला सुरुवात होईल. गुलाबी थंडी आणि निर्सगाचे सौंदर्य पाहाण्यासाठी आपण अनेक जण फिरण्याचे प्लान करतात. अशातच भारतातील पर्यटन स्थळांसाठी प्रसिद्ध असलेल दक्षिण भारत. याची सफर आता बजेटमध्ये करता येणार आहे.
केरळमध्ये भेट देण्यासाठी आणि फिरण्यासाठी अनेक निसर्गरम्य आणि धार्मिक स्थळं आहेत. मात्र तुम्हाला जर विकेंडला निसर्गाच्या कुशीत घालवयाचे असेल तर आयआरसीटीसीचा बजेटमधला टूर प्लान पाहू शकता. कमी खर्चात तुम्ही दक्षिण भारताची सफर करु शकता. बुकिंग कशी कराल? खर्च किती होईल? जाणून घेऊया
पॅकेजचे नाव - रामेश्वरम आणि कन्याकुमारीसह केरळ
पॅकेज किती दिवसांचा - ७ रात्री ८ दिवस
प्रवास कसा करणार? - फ्लाइट (Flight)
कुठे कुठे जाता येईल? - कन्याकुमारी, कोची, कुमारकोम, मदुराई, मुन्नार, रामेश्वरम आणि त्रिवेंद्रम
टूर पॅकेजची तारीख - ६ फेब्रुवारी २०२४ ते १३ फेब्रुवारी २०२४ पर्यंत
या पॅकेजमध्ये तुम्हाला राउंड ट्रिप (Trip) फ्लाइटसाठी इकॉनॉमी क्लासची तिकिटे मिळतील.
तसेच राहाण्यासाठी हॉटेल सुविधा मिळणार आहे.
या टूर पॅकेजमध्ये ब्रेकफास्ट आणि जेवण मिळेल.
या पॅकेजमध्ये प्रवास विम्याची सुविधाही मिळणार आहे.
जर तुम्ही सोलो ट्रिप करत असाल तर तुम्हाला ७३,१५० रुपये (Price) मोजावे लागतील.
तर कपल्ससाठी एका व्यक्तीला ५५,५०० रुपये मोजावे लागणार आहे.
तीन लोक या ट्रिपला जाणार असाल तर प्रत्येकाला ५३, ८५० रुपये भरावे लागणार आहे.
जर तुम्ही मुलांना घेऊन जाणार असाल तर बेडसाठी ४९,३५० रुपये मोजावे लागणार आहे. तर बेडशिवाय तुम्हाला ४३,५०० रुपये मोजावे लागणार आहे.
या टूर पॅकेजसाठी तुम्हाला IRCTC च्या अधिकृत वेबसाटला भेट द्यावी लागेल. त्यावरुन तिकीट बुक करता येईल. याशिवाय IRCTC पर्यटक सुविधा केंद्र, कार्यालयातूनही बुकिंग करता येईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.