iPhone 14 झाला स्वस्त, 35000 पेक्षा कमी किंमतीत मिळत आहे 128GB मॉडेल; जाणून घ्या काय आहे ऑफर

iPhone 14 झाला स्वस्त, 35000 पेक्षा कमी किंमतीत मिळत आहे 128GB मॉडेल
iPhone Offer
iPhone OfferSaam Tv
Published On: 

Amazon Iphone 14 Offer: Apple ने गेल्या वर्षी आपली iPhone 14 सीरीज लॉन्च केली होती. या सीरीजमध्ये iPhone 14, iPhone 14 Plus, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max मॉडेल्सचा समावेश आहे. या सीरीजमध्ये iPhone 14 सध्या सर्वात कमी किमतीत उपलब्ध आहे.

iPhone 14 च्या बेस मॉडेलमध्ये 128GB स्टोरेज उपलब्ध आहे, जो 79,900 मध्ये लॉन्च करण्यात आला होता. मात्र तुम्ही हा 35 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता. हे एकूण नक्कीच तुम्हाला धक्का बसला असेल. मात्र हो हे खरं आहे. हा फोन इतका स्वस्त कुठे मिळत आहे, याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ.

iPhone Offer
Google Vs European Union: अबब! गुगलला भरावा लागणार तब्बल 2296 कोटींचा दंड, जाणून घ्या काय आहे कारण

काय आहे ऑफर?

iPhone 14 सध्या Amazon वर सर्वात मोठ्या सवलतीसह उपलब्ध आहे. येथे iPhone 14 128GB ब्लू आणि Starlight कलर व्हेरिएंट सध्या 67,499 रुपयांना उपलब्ध आहे. या फोनची मूळ किंमत 79,900 रुपये आहे, म्हणजेच फोनवर 12,401 रुपयांची सवलत आहे. पण ऑफर इथेच संपत नाही...  (Latest Marathi News)

Amazon तुमच्या जुन्या मोबाइलवर 22,900 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देखील देत आहे. म्हणजेच जर तुमच्याकडे एक्सचेंजसाठी जुना फोन असेल तर तुम्हाला फोनवर 22,900 रुपयांपर्यंतची अतिरिक्त सूट मिळू शकते. परंतु येथे तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल ,की एक्सचेंज बोनसचे मूल्य जुन्या फोनची स्थिती, मॉडेल आणि ब्रँडवर अवलंबून असेल.

iPhone Offer
Amazon Prime Lite : जियो सिनेमाला टक्कर देण्यासाठी अ‍ॅमेझॉन सज्ज; नव्या ऑफरमुळे यूजर्सचं स्वस्तात फुल्ल एन्टरटेंमेंट

तुमच्या जुन्या फोनवर पूर्ण एक्सचेंज ऑफर मिळवल्यास आयफोनची किंमत फक्त 44,599 रुपयांपर्यंत खाली येईल. याचा अर्थ असा की तुम्ही हा फोन 35,301 कमी किंमतीत खरेदी करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.