आज कॅलिफोर्नियातील Apple पार्कमधील स्टीव्ह जॉब्स थिएटरमध्ये आज iPhone ची सीरिज लॉन्च होणार आहे. आज iPhone च्या चाहत्यांची प्रतीक्षा संपणार आहे. आज रात्री १०.३० वाजता थेट Apple चे प्रोडक्ट लॉन्च होणार आहे.
या इव्हेंटमध्ये कंपनी या सीरिजमधील चार आयफोन लॉन्च करू शकते – iPhone 15 , iPhone 15 Plus, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max. तसेच लेटस्ट आयफोन्स समोर आल्याने जुने मॉडेल्स बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
1. iPhone 12 वर डिस्काउंट
iPhone 12 चा बेस 64GB व्हेरिएंट साधारणपणे 59,900 रुपयांना Amazon वर विकला जात आहे.
पण सध्या या फोनवर आयफोन प्रेमींना सवलत मिळत आहे. तसेच जर तुम्ही एक्सचेंज डील किंवा बँक ऑफरमध्ये घेत असाल तर किमत अजून कमी होऊ शकते.
HDFC बँकेच्या कार्डाने फोन खरेदी केल्यास तुम्हाला 2,000 रुपयांची सूट मिळेल.
2. ऑफर
Amazon च्या iPhone 12 वर बिग एक्सचेंज बोनस देखील उपलब्ध आहे. यामध्ये तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज केल्यास तुम्हाला 24,900 रुपयांची सूट मिळेल. परंतु हा डिस्काउंट तुमच्या फोनच्या स्थितीवर अवलंबून असेल. एक्सचेंज ऑफरची उपलब्धता तपासण्यासाठी तुम्हाला पिन कोड देखील टाकावा लागेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.