
International Women's Day : समस्त महिला वर्गांना जागतिक महिला दिनांच्या शुभेच्छा ! आंतरराष्ट्रीय महिला दिन हा 8 मार्चला जगभरात साजरा केला जातो. हा दिवस महिलांच्या सांस्कृतिक, राजकीय व सामाजिक कामगिरीच्या स्मरणार्थ दरवर्षी साजरा केला जाणारा दिवस आहे.
1. स्त्री म्हणजे अडथळ्यांवर मात,
स्त्री म्हणजे क्षणाची साथ तुझ्या
कतृत्वाला सर्वांचा सलाम
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा !
2. ज्याला स्त्री ‘आई’ म्हणून कळली,
तो जिजाऊंचा ‘शिवबा’ झाला..
आणि ज्याला स्त्री ‘बहीण’ म्हणून कळली
तो मुक्ताईचा ‘ज्ञानदेव’ झाला..
ज्याला स्त्री ‘मैत्रीण’ म्हणून कळली
तो राधेचा ‘शाम’ झाला..
आणि ज्याला स्त्री ‘पत्नी’ म्हणून कळली
तो सीतेचा ‘राम’ झाला..
“प्रत्येक महान व्यक्तींच्या जीवनात आणि
यशात स्त्रियांचा सिंहाचा वाटा आहे…”
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!
3. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली
भूमिका योग्य पद्धतीने साकारणाऱ्या
माझ्या आई, बहीण, पत्नी आणि
लेकीस महिला दिनाच्या शुभेच्छा !
4. आज जागतिक महिला दिनानिमित्त
सगळ्या माझ्या बहिणींना, युवतींना,
विविध पातळीवर यशाची
उंच झेप घेणाऱ्या महिला साथींना,
शेतामध्ये राबून सोनं पिकवणाऱ्या माझ्या
कष्ट करणाऱ्या बहिणींनाही आभाळभर शुभेच्छा…
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!
5. ती आहे म्हणून सारे विश्व आहे,
ती आहे म्हणून सारे घर आहे,
ती आहे म्हणून सुंदर नाती आहेत,
आणि केवळ ती आहे,
म्हणून नात्यांमध्ये प्रेम आहे…”
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!
6. पूर्वजनमाची पुण्याई असावी,
जन्म तो तुझ्या गर्भात घेतला,
जग पाहिला नव्हतं तरी,
नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!
7. विधात्याची नव निर्माणाची कलाकृती
तू एक दिवस तरी स्वत:च्या
अस्तित्वाचा साजरा कर तू..
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!
8. जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
“स्त्रियांना चढूद्या,
शिक्षणाची पायरी शिकून
सावरतील दुनिया सारी.”
9. जागतिक महिला दिन फोटो
“महिलांना कोणावर अवलंबून
राहण्याची गरज नाही कारण
संपूर्ण घरच घरातील महिलांवर
अवलंबून असत
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!”
10. “जिनं शिल्पकार होऊन तुमच्या
जीवनाला आकार दिला,
अशा प्रत्येक ‘ती’ला
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.