Working Women : दररोजच्या बिझी लाईफस्टाईलमुळे अनेक महिलांना स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. खास करून वर्किंग वुमन्सला घर आणि ऑफिस सांभाळणे कठीण होऊन जाते. परंतु जर एका स्त्रीने ठरवलं तर ती, घरातील कामांसोबत ऑफिस वर्क सांभाळून बाहेरच्या इतर कामांमध्ये लक्ष देऊन, स्वतःची फिटनेस देखील सांभाळू शकते.
घर आणि ऑफिसचे (Office) काम करत असताना अनेक महिला स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. परंतु असं असल्याने तुम्ही अनेक प्रॉब्लेम्सचे शिकार होऊ शकता. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला वर्किंग वूमन केअर टिप्स सांगणार आहोत. ज्यांना फॉलो करून तुम्ही हेल्दी लाइफस्टाइल एन्जॉय करू शकता.
हेवी नाश्ता करा -
कामामध्ये व्यस्त असल्यामुळे अनेक वर्किंग वुमन्सला नाश्ता करण्यासाठी वेळच मिळत नाही. अशावेळी तुम्हाला तुमचा नाष्टा भरपूर प्रमाणात करायचा आहे. हेवी नाष्टा केल्याने तुम्ही दिवसभर स्वतःला एनर्जीटिक फील करू शकता. सोबतच तुमचे पोट भरलेले राहील आणि तुम्ही कोणत्याही कामांमध्ये स्वतःला लो फील करणार नाही.
हेल्दी डायट करा -
वर्किंग महिला (Women) बऱ्याचदा भूक लागल्यावर तळलेले पदार्थ किंवा फास्ट फूड खाऊन स्वतःचे पोट भरण्याचे काम करतात. असं केल्याने तुमच्या शरीराला पोषण कमी प्रमाणात मिळते आणि तुम्ही लवकर आजारी पडू शकता.
त्यामुळे तुम्ही नेहमी घरातील जेवणाकडे जास्त लक्ष दिले पाहिजे. तुम्ही तुमच्या डायटमध्ये दही, सीजनल फ्रुट्स, हिरव्या गार भाज्या आणि न्यूट्रियन्स रीच पदार्थांचे सेवन केले पाहिजे. जेणेकरून तुम्ही हेल्दी आणि फिट राहू शकाल.
भरपूर पाणी प्या -
अनेक वर्किंग महिला कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे पाणी पिण्याचे विसरूनच जातात. परंतु असं केल्याने तुम्हाला डीहायड्रेशनची समस्या होऊ शकते. त्यामुळे करताना मध्ये मध्ये पाणी पिणे अत्यंत गरजेचे आहे. सोबतच तुम्ही दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी पिऊन स्वतःला हायड्रेट ठेवू शकता.
तणाव मुक्त रहा -
घर आणि ऑफिसच्या कामामुळे अनेक महिला स्ट्रेस घेतात. परंतु असं केल्याने तुमचं कामांमध्ये मन लागत नाही आणि तुमचा मूड देखील खराब होतो. त्यामुळे कामाच्या वेळी स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुम्ही तणावमुक्त राहाल.
रिलॅक्ससिंग थेरेपी ट्राय करा -
वर्किंग वुमन्सला कामाच्या वेळी थकवा जाणवू शकतो. अशावेळी तुम्ही कामामधून वीस मिनिटांचा ब्रेक घेऊन डोळे रिलॅक्स ठेवण्यासाठी थेरपी घेऊ शकता. सोबतच तुम्ही वॉक देखील करू शकता.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.