Instagramच्या यूझर्सला मिळणार नव्या वर्षाचं गिफ्ट; Insta स्टोरीमध्ये येतंय नवं फीचर

Instagram Stories Feature: मेटा युझर्सचा अनुभव वाढवण्यासाठी Instagram च्या स्टोरी सेक्शनमध्ये विशेष अपडेट आणली जात आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्या 'स्पेशल वन'ची एकही स्टोरी सुटणार नाही.
Instagram
Instagram Stories FeatureSaam Tv
Published On

फोटो आणि व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम हे आजकाल सर्वांचे आवडते ॲप बनलंय. ॲपचे रील आणि स्टोरी फीचर सर्वाधिक आश्चर्यकारक आहेत. यामुळे लाखो युझर्सला त्याचं वेड लागलंय. मेटा आता या स्टोरी सेक्शनसाठी एक विशेष अपडेट आणत आहे. याचे नाव आहे Unseen Story Highlights. कंपनी सध्या या नवीन फीचरची चाचणी करत आहे.

स्टोरी हायलाइट्स नावावरून असं वाटतं की, या फीचरच्या मदतीने युजर्सला अशा लोकांच्या स्टोरी पाहायला मिळतील ज्यांना तुमच्याकडून सुटल्या असतील. टेकक्रंचच्या अलीकडील अहवालानुसार, हे स्टोरी हायलाइट्स युझर्सच्या स्टोरी सेक्शनच्या शेवटी दिसून येईल. जे ॲपच्या शीर्षस्थानी वेगळ्या सेक्शनमध्ये दिसेल. नवीन फीचरविषयी मेटा कंपनीने सांगितलं की, “आम्ही नेहमी नवीन गोष्टींवर काम करत असतो.

Instagram
Whats App युझर्ससाठी आनंदाची बातमी, प्रेमी जोडप्यांसाठी चॅटिंग झालं सोपं

ज्यामुळे लोकांना स्टोरीजमधून कनेक्ट करता येईल. तसेच स्टोरी ट्रेच्या शेवटी अलीकडील हायलाइट्स शेअर करत असतो .”

हे नवीन फीचर कसे करेल मदत?

आता इंस्टाग्राम स्पॉसर्ड पोस्ट आणि रॅडम रिल्सने भरलेले आहे, यात हे नवीन फीचर बरेच उपयुक्त ठरू शकते. कारण ते युझर्सच्या मित्रांची नवी अपडेट देण्याचा एक जलद मार्ग उपलब्ध करून देईल. कंपनीने असेही म्हटलं की, या फीचरच्या मदतीने युझर्स गेल्या आठवड्यातील न पाहिलेले स्टोरी सुद्धा हायलाइट्समध्ये पाहू शकतील.

Instagram
Fact Check : तुमच्या फोनवर व्हॉट्सअॅप बंद होणार? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? VIDEO

पण हे तेव्हाच होईल, जेव्हा तुम्ही इस्टाग्रामवरील सर्वच इस्टास्टोरीज पाहिल्या असतील. म्हणजेच जर तुम्ही अनेकांना फॉलो करत असला आणि इस्टास्टोरीज पूर्ण पाहत नसाल तर तुम्हाला सुटलेल्या स्टोरीज हायलाइट्समध्ये दिसणार नाहीत. यापूर्वी, कंपनीने फोटो आणि व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्मवर WhatsApp चे लाइव्ह लोकेशन शेअर फीचर देखील जोडले होते.

ज्याच्या मदतीने तुमचा पार्टनर कुठे फिरतोय याची प्रत्येक क्षणाची माहिती काही मिनिटांतच मिळते. आता तुम्ही DM मध्ये लाइव्ह लोकेशन कुणालाही 1 तासापर्यंत शेअर करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com