

Vande Bharat New Design : भारतीय रेल्वे देशभरात एकापाठोपाठ एक वंदे भारत ट्रेन सुरू करत आहे. यासोबतच वंदे भारत रेल्वेच्या फीडबॅकच्या आधारे ट्रेनमध्येही बदल करत आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी सांगितले की, वंदे भारत ट्रेनमध्ये 25 नवीन घडामोडी करण्यात आल्या आहेत. ते म्हणाले की, रेल्वेच्या फीडबॅकच्या आधारे वंदे भारत ट्रेनमध्ये बदल करत आहे.
रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, नवीन सेफ्टी फीचर अँटी-क्लेम्बर्सवरही काम केले जात आहे. विशेष म्हणजे वंदे भारत ट्रेन आता वेगळ्या रंगात (Colors) पाहायला मिळत आहे. नवीन वंदे भारत केशरी, हिरव्या, पांढरा आणि काळ्या रंगाच्या संयोजनात दिसत आहे.
रेल्वेमंत्र्यांची कोच फॅक्टरीला भेट
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) ला भेट दिली. या कारखान्यात वंदे भारत गाड्या तयार केल्या जात आहेत. रेल्वेमंत्र्यांच्या या दौऱ्याचे व्हिडिओ आणि फोटो समोर आले आहेत. वंदे भारत ट्रेनच्या नव्या रंगाची माहिती या फोटोंवरून समोर आली आहे.
वंदे भारतातील 25 नवीन सुधारणा
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, केंद्रीय रेल्वे (Railway) मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी येथील इंटिग्रल कोच कारखान्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी दक्षिण रेल्वेमधील सुरक्षा उपायांचा आढावा घेतला आणि वंदे भारत एक्स्प्रेसमधील सुधारणांचाही आढावा घेतला. पाहणीनंतर केंद्रीय मंत्री म्हणाले की स्वदेशी ट्रेनच्या 28 व्या रेकचा नवीन रंग 'भारतीय तिरंग्यापासून प्रेरित' आहे.
अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, ते म्हणाले की, वंदे भारत (Vande Bharat) गाड्यांमध्ये 25 सुधारणा करण्यात आल्या आहेत. अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, 'ही मेक इन इंडियाची संकल्पना आहे, ती भारतात आमच्याच अभियंते आणि तंत्रज्ञांनी तयार केली आहे. त्यामुळे, वंदे भारतच्या कार्यादरम्यान एसी, टॉयलेट इत्यादींबाबत फील्ड युनिट्सकडून आम्हाला जे काही अभिप्राय मिळत आहेत, त्या सर्व सुधारणांचा वापर डिझाइनमध्ये बदल करण्यासाठी केला जात आहे. आम्ही काम करत असलेल्या 'अँटी क्लाइम्बर्स' किंवा अँटी-क्लायम्बिंग डिव्हाइस या नवीन सुरक्षा वैशिष्ट्याचाही आज आढावा घेण्यात आला. वंदे भारत आणि इतर गाड्यांमध्ये या सर्व मानक सुविधा असतील.'
वंदे भारत भाडे कमी केले जाईल
एसी ट्रेनच्या तिकिटांचे भाडे कमी करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने सवलतीच्या भाड्याची योजना आणली आहे. याअंतर्गत वंदे भारतसह एसी चेअर कार आणि एसी आसन सुविधा असलेल्या सर्व गाड्यांच्या भाड्यात कपात केली जाईल. प्रवाशांच्या संख्येनुसार तिकीट दर 25 टक्क्यांपर्यंत कमी होतील. याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.