Skin care tips : त्वचेचे सौंदर्य टिकवण्यासाठी आपल्या स्वयंपाकघरातील या पदार्थांचा आहारात समावेश करा

या पदार्थाचा आहारात समावेश केल्यास त्वचेच्या आरोग्यावर लक्षणीय परिणाम होईल.
Skin care, Skin care tips, Diet plan
Skin care, Skin care tips, Diet plan ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : त्वचा हा शरीराचा महत्त्वपूर्ण भाग जरी असला तरी तो नाजूक भाग असतो. त्वचेचे सौंदर्य टिकवण्यासाठी आपण अनेक महागडे किंवा घरगुती पदार्थांचा वापर करुन ते टिकवण्याचा प्रयत्न करत असतो.

हे देखील पहा -

त्वचा, केस व नखे हे आपल्या आरोग्याची पौष्टिक स्थिती आपल्याला दर्शवत असतात. ज्यावेळी शरीरातील पोषक तत्वे कमी होऊ लागतात तेव्हा त्याचा सर्वाधिक परिणाम हा आपल्या त्वचेवर होऊ लागतो. त्यामुळे त्वचा कोरडी पडणे, मुरुमे येतात. यासाठी आपण मेकअप किटकडे वळतो अशावेळी आपण आपल्याला आहारात काही पदार्थांचा समावेश केल्यास त्वचेचे सौंदर्य टिकून राहण्यास मदत होईल जाणून घेऊया त्या विषयी.

१. आपल्या त्वचेच्या उतीच्या दुरुस्तीसाठी व कोलेजन संश्लेषणासाठी ढोबळी मिरची महत्त्वाची ठरते. तसेच ती अँटिऑक्सिडंट म्हणून काम करते. यात उच्च फायबर व कमी ऊर्जा आढळून येते. जीवनसत्त्व ए, ब-६, क आणि के, लोह, पोटॅशियम आणि मॅंगनीज सारखे पोषक घटक देखील आहेत. ज्याच्या त्वचेसाठी अधिक प्रमाणात फायदा होतो.

Skin care, Skin care tips, Diet plan
Uses of sleeping eye mask : स्लिपिंग आय मास्क लावून झोपल्यास डोळ्यांचा प्रकाशापासून होईल बचाव

२. माशात ओमेगा -३ फॅटी ऍसिडस्, प्रथिने, जीवनसत्त्व ई आणि जस्त आढळून येतात. जे आपल्या शरीरातील जळजळ कमी करून आपली त्वचा मॉइश्चराइज ठेवू शकतात.

३. अक्रोडमध्ये जीवनसत्त्व ई, जस्त, सेलेनियम व प्रथिने यांचा उत्तम स्त्रोत आढळून येतो. हे सर्व पोषक घटक आढळतात. जे आपल्या त्वचेला (Skin) निरोगी राहण्यासाठी मदत करते.

४. ब्रोकोलीमध्ये कॅरोटीनॉइड्स, जीवनसत्त्वे आणि खनिजांचा उत्तम स्रोत आहे ज्यामुळे आपल्याला त्वचेचा कर्करोग टाळता येऊ शकतो. तसेच याचे सेवन केल्यास आपल्या त्वचा सुधारण्यास मदत होते.

५. टोमॅटोत जीवनसत्त्व (Vitamins) क आणि कॅरोटीनॉइड्सचा चांगला स्रोत आहे. याचे सेवन केल्यास त्वचेला सूर्य किरणांच्या नुकासानीपासून वाचवू शकते व सुरकुत्या रोखण्यास देखील मदत करते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com