

कोलोरेक्टल कॅन्सर (CRC) हा आजार पुर्वी वृद्धांमध्ये दिसणारा रोग मानला जात होता. मात्र अलीकडच्या काळात तरुणांमध्येही या आजाराचे प्रमाण झपाट्यानं वाढताना पाहायला मिळतंय. भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद (ICMR) यांनी नोंदवलेल्या ताज्या आकडेवारीनुसार भारतात प्रकरणांची संख्या पाश्चात्त्य देशांच्या तुलनेत कमी असली, तरी तरुण वयोगटात होणाऱ्या वाढीमुळे अपूरी झोप, जास्त स्क्रिनिंग आणि बदललेल्या जीवनशैलीच्या पद्धतींची गरज निर्माण झाली आहे.
कोलन कॅन्सरचे निदान जितक्या लवकर होतं, तितकेच उपचार यशस्वी ठरतात. मात्र त्याहून महत्त्वाचे म्हणजे रोजच्या आहारात आरोग्यदायी खाद्यपदार्थांचा समावेश केल्यास या आजाराचा धोका काही प्रमाणात कमी करता येऊ शकतो. अमेरिकास्थित गॅस्ट्रोएन्टेरॉलॉजिस्ट डॉ. जोसेफ सलहाब यांनी अशा सहा स्नॅक्सची माहिती दिली आहे, जे कोलन कॅन्सर विरोधात प्रभावी ठरू शकतात. या खाद्यपदार्थांनी कोलन कॅन्सरचा धोका कमी करण्यामध्ये सर्वाधिक प्रभाव दाखवला आहे, असे त्यांनी सांगितले.
डॉ. सलहाब यांनी पहिला पर्याय म्हणून टरबूज आणि लिंबाचा उल्लेख केला. ताज्या टरबूजावर लिंबू पिळून खाल्ल्याने लाइकोपीन आणि व्हिटॅमिन C एकत्र कार्य करतात आणि कोलन कॅन्सरचा धोका कमी करण्यास मदत होते. दुसरा स्नॅक्स म्हणजे अक्रोड आणि दह्याचे मिश्रण. अक्रोडमधील ओमेगा-3 फॅटी ऍसिड्स आणि दह्यातील प्रोबायोटिक्स पचनसंस्थेचे आरोग्य सुधारतात व संरक्षक जीवाणू वाढवतात. त्यामुळे हा खूपच पौष्टिक आणि कॅन्सरपासून बचाव करणारा पर्याय ठरतो.
तिसरा पर्याय म्हणजे अवोकॅडो आणि साल्सा. यात असलेले फायबर, हेल्दी फॅट्स आणि प्रोबायोटिक्स आतड्यातील मायक्रोबायोम सुधारतात आणि कोलनमधील रोगप्रतिकारक पेशी मजबूत करतात.
चौथ्या नाश्त्यामध्ये ब्लूबेरी आणि चिया सीड्सचा समावेश आहे. यांची स्मूदी तयार केल्याने अँथोसायनिन्स आणि सोल्युबल फायबर मिळतात, जे आतड्यांतील चांगल्या जीवाणूंना पोषण देतात आणि कॅन्सरविरोधी संरक्षण वाढवतात.
पाचवा पर्याय म्हणजे सफरचंद आणि दालचिनी. यातील पेक्टिन फायबर आणि पॉलीफेनॉल्स शरीरात ब्यूट्रेटचे प्रमाण वाढवतात, जे जळजळ कमी करून आंतड्यांचे आरोग्य सुधारतात.
टीप: मात्र कोणत्याही विशिष्ट आजाराबाबत निदान किंवा उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यावश्यक आहे. हा लेख केवळ सर्वसाधारण आरोग्यविषयक माहिती पुरवतो आणि वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.