

Importance Of Seabelt: मोठ्या अपघातातून वाचण्यासाठी गाडी चालवताना किंवा गाडीतून प्रवास करताना सिटबेल्टचा वापर करावा असे नेहमीच सांगितले जाते. मोठा अपघात झाल्यानंतर किंवा अचानक गाडीने ब्रेक घेतल्यानंतर गाडीमध्ये बसलेल्या व्यक्तीला हादरा बसण्याची शक्यता असते. त्यामुळेच गाडी चालवताना सिल्टबेल्ट लावण्याचा सल्ला देत असतात. हा सल्ला गाडी चालवणारा किंवा गाडीमध्ये पुढे बसून प्रवास करणारा व्यक्तीच प्रामुख्याने पाळतो.
मात्र आज आम्ही सेटबेल्ट लावण्याचे असे काही फायदे सांगणार आहोत, ज्यानंतर पाठीमागे बसलेले प्रवासीही न चुकता सिटबेल्ट लावतील..
कार कंट्रोलमध्ये राहते- गाडी चालवताना रस्ता खराब असेल किंवा गाडी जास्त स्पिन होत असेल तर सिटबेल्ट लावला असल्याने चालकाला गाडीवर नियंत्रण ठेवता येते.
कारमधून बाहेर पडण्याचा धोका नाही- गाडीमध्ये सिटबेल्ट लावून प्रवास केल्याने अपघात झाल्यास बाहेर फेकले जाण्याची किंवा जखमी होण्याची शक्यता कमी असते.
संपूर्ण शरिराला संरक्षण मिळते- सिट बेल्ट कंबर आणि खांद्यावर लावला जातो ज्यामुळे तुमचं डोकं, छाती आणि पोटाला संरक्षण मिळतं. यासोबतच सीट बेल्ट मेंदूला होणारी दुखापत आणि पाठीच्या कण्याला दुखापत होण्यापासून संरक्षण देतो. (Car Accident)
एअरबॅग्ज वेळेवर उघडतात- अनेक नव्या वाहनांमध्ये सिटबेल्ट लावला असेल तरच एअरबॅग्ज उघडतात. त्यामुळे सीटचबेल्ट न लावणे म्हणजे थेट मृत्यूला आमंत्रण ठरु शकते.
विमा मिळत नाही- अपघातानंतर जर आपण सिटबेल्ट लावला नसेल तर विमा कंपनी आपल्याला नुकसान भरपाई देत नाही. या कारणामुळेही सिटबेल्ट लावणे आवश्यक आहे. अन्यथा आपल्याला मोठे नुकसान झाल्यास त्याची भरपाई किंवा अपघात विमा मान्य केला जात नाही. (insurance)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.