Heart blockage symptoms: ही 5 लक्षणं दिसली तर समजा की हृदयाच्या नसा ब्लॉक झाल्यात; हार्ट अटॅक येण्यापूर्वी लक्ष द्या

Blocked heart arteries: हृदयाच्या रक्तवाहिन्या अरुंद झाल्यास काही संकेत जाणवू शकतात. सतत थकवा, धाप लागणे, चक्कर येणे, हात-पाय थंड पडणे आणि हृदयाची धडधड वाढणे यांसारखी लक्षणे दिसल्यास योग्य वैद्यकीय तपासणी महत्त्वाची आहे.
Heart blockage symptoms
Heart blockage symptomssaam tv
Published On: 

हार्ट अटॅक अचानक येतो असं अनेकांना वाटतं. मात्र अनेक वेळा हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये वर्षानुवर्षे चरबीचा थर जमा होत जातात. त्यामुळे रक्तवाहिन्या हळूहळू अरुंद होतात आणि हृदयाला मिळणारा ऑक्सिजन कमी होऊ शकतो. त्यामुळे हार्ट अटॅकचा धोका निर्माण होतो.

हृदयाशी संबंधित त्रास वेळीच लक्षात आला तर त्यावर उपचार आणि जीवनशैलीतील बदलांच्या मदतीने नियंत्रण ठेवता येऊ शकतं. औषधं, योग्य आहार आणि नियमित व्यायाम यामुळे अनेक लोक दीर्घकाळ सामान्य आयुष्य जगू शकतात. नियमित आरोग्य तपासणी महत्त्वाची आहेत. मात्र शरीर काही संकेतही देतं. हे संकेत इतर कारणांमुळेही दिसू शकतात. त्यामुळे ते दिसले म्हणजे रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्याच आहेत, असं समजू नये.

Heart blockage symptoms
World Heart Day: ब्लॉकेज कमी होतील आणि हार्ट अटॅक येणारच नाही! ही 1 भाजी करेल तुमच्या नसा साफ

सतत जाणवणारा थकवा

काम, घरातील जबाबदाऱ्या किंवा दिवसभराची धावपळ यामुळे थकवा येणं सामान्य आहे. मात्र अचानक खूप थकवा जाणवू लागला आणि विश्रांती घेतल्यानंतरही तो कमी होत नसेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. हृदय किंवा शरीराच्या इतर अवयवांना पुरेसा रक्तपुरवठा होत नसेल, तर अगदी कमी काम केल्यानंतरही शरीरातील ऊर्जा संपल्यासारखी वाटू शकते. महिलांमध्ये हा प्रकार अधिक जाणवू शकतो. काही महिलांना छातीत दुखण्याऐवजी नेहमीची कामं करतानाच जास्त थकवा जाणवतो.

धाप लागणं

हृदयाकडे किंवा फुफ्फुसांकडे जाणारा रक्तप्रवाह कमी झाल्यास श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. सुरुवातीला व्यायाम करताना, चालताना किंवा थोडं काम केल्यानंतर धाप लागू शकते. काही वेळा झोपताना किंवा सरळ आडवं झाल्यावरही श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. विशेष म्हणजे काही लोकांना अशा वेळी छातीत दुखतही नाही. फक्त छातीत दडपण आल्यासारखं किंवा पूर्ण श्वास घेता येत नसल्यासारखं वाटू शकतं. हा त्रास अचानकही सुरू होऊ शकतो.

चक्कर येणं

अचानक चक्कर येणं, डोकं हलकं वाटणं किंवा आपण बेशुद्ध पडू की काय असं वाटणं, हेही शरीरातील रक्तपुरवठ्याशी संबंधित असू शकतं. मेंदूला पुरेसा रक्तपुरवठा न झाल्यास अशी लक्षणं दिसू शकतात. उठताना, व्यायाम करताना किंवा बराच वेळ एकाच जागी बसल्यानंतर काही लोकांना चक्कर येऊ शकते. मात्र हा त्रास वारंवार होत असेल किंवा त्यासोबत तोल जाण्याची समस्या निर्माण होत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये.

Heart blockage symptoms
Fatty liver: लिव्हरवरची चरबी काढून टाकतील 'या' ५ भाज्या, आजपासून करा आहारात समावेश

हात-पाय थंड पडणं

रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाला की त्याचा परिणाम फक्त हृदयापुरता मर्यादित राहीलच असं नाही. हात किंवा पायांपर्यंत जाणारा रक्तप्रवाह कमी झाल्यास त्या भागात थंडी, बधिरपणा किंवा अशक्तपणा जाणवू शकतो. एका हाताला किंवा पायाला अचानक जास्त त्रास जाणवत असेल तर त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. रक्तवाहिन्या अरुंद झाल्यामुळे हात-पायांच्या टोकापर्यंत ऑक्सिजनयुक्त रक्त पुरेशा प्रमाणात पोहोचू शकत नाही.

हृदयाची धडधड अचानक वाढणं

हृदय जोरात धडधडत आहे, वेगाने धावत आहे किंवा मध्येच ठोका चुकल्यासारखा वाटत आहे, याला हार्ट पॅल्पिटेशन म्हणजेच हृदयाची धडधड जाणवणे असं म्हणतात. ही भावना व्यायाम करताना, विश्रांती घेताना किंवा रात्री झोपताना देखील जाणवू शकते. अनेक वेळा हृदयाची धडधड जाणवण्यामागे गंभीर कारण नसतं. मात्र काही परिस्थितींमध्ये हृदयाच्या समस्यांशीही त्याचा संबंध असू शकतो.

Heart blockage symptoms
Liver Transplant Signs: लिव्हर फेल होत असल्याचे ‘हे’ संकेत वेळीच ओळखा; जाणून घ्या ट्रान्सप्लांटची वेळ आलीय का?

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com