World Heart Day: ब्लॉकेज कमी होतील आणि हार्ट अटॅक येणारच नाही! ही 1 भाजी करेल तुमच्या नसा साफ

Foods for better digestion: अरबी म्हणजेच Taro Root मध्ये फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. संतुलित आहाराचा भाग म्हणून अरबीचा समावेश केल्याने पचन, रक्तातील साखर आणि एकूण आरोग्याला संभाव्य फायदे मिळू शकतात.
Foods for better digestion
Foods for better digestionsaam tv
Published On: 

गेल्या काही काळापासून हार्ट अटॅकच्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून येतं. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, आहारात काही बदल केले की हार्ट अटॅकच्या समस्येपासून दूर राहता येतं. असंच एक भाजी आहे जी तुम्हाला हार्ट अटॅकपासून दूर ठेवते. ही भाजी म्हणजे अरबीची भाजी.

अरबीची भाजी आपल्या घरात नेहमीच बनवली जाते. चवीला चांगली असलेली ही भाजी अनेकांना खायला आवडते. अरबीला इंग्रजीमध्ये Taro Root असं म्हणतात. अरबीमध्ये फायबरसह शरीरासाठी आवश्यक असलेले अनेक पोषक घटक आढळतात. त्यामुळे आहारात अरबीचा समावेश केल्यास आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात.

भारताचे प्रसिद्ध न्यूट्रिशन एक्सपर्ट निखिल वत्स यांनी अरबी खाण्याचे काही फायदे सांगितलेत. या भाजीमुळे हार्ट आणि कॅन्सरचा धोकाही कमी होतो. जाणून घेऊया अरबीची भाजी खाल्ल्याने कोणते फायदे होऊ शकतात.

हार्ट अटॅक आणि कॅन्सर

अरबीमध्ये अँटीऑक्सिडंट्स, पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई यांसारखे पोषक घटक असतात. हे घटक शरीरासाठी महत्त्वाचे आहेत. आहारात अरबीचा समावेश केल्यास हृदयाशी संबंधित आजार आणि क‌ॅन्सर गंभीर आजारांचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते.

ब्लड शुगर

अरबीमध्ये स्टार्चचं प्रमाण चांगलं असतं. त्यामध्ये दोन प्रकारचे कार्बोहायड्रेट्स असतात, जे ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकतात. अरबी खाल्ल्यामुळे पचनाची प्रक्रिया आणि शरीरात कार्बोहायड्रेट्स शोषले जाण्याची प्रक्रिया थोडी हळू होते. त्यामुळे जेवल्यानंतर रक्तातील साखर अचानक वाढण्याचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते.

Foods for better digestion
Heart disease: जॅम-च्युइंग गम खाताय? मग सावधान! ‘या’ स्वीटनरमुळे हार्ट अटॅक-स्ट्रोकचा धोका?

रोगप्रतिकारक शक्ती

अरबीमध्ये अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे ती खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच इम्युनिटी मजबूत होण्यास मदत होऊ शकते. अरबीमध्ये असलेले व्हिटॅमिन सी अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते. त्यामुळे शरीराची आजाराची लढण्याची क्षमता वाढण्यास मदत होते.

वजन कमी करण्यास

वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठीही अरबी फायदेशीर ठरू शकते. अरबी खाल्ल्यानंतर बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे दिवसभरात जास्त कॅलरी खाणं कमी होण्यास मदत होऊ शकते. अरबीमध्ये कॅलरीचं प्रमाणही कमी असतं. त्यामुळे वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर आहारात अरबीच्या भाजीचा समावेश करू शकता.

Foods for better digestion
Fatty liver: लिव्हरवरची चरबी काढून टाकतील 'या' ५ भाज्या, आजपासून करा आहारात समावेश

पोटाच्या समस्या कमी होण्यास मदत

अरबीमध्ये फायबरचं प्रमाण भरपूर असतं. फायबरमुळे पचनक्रिया व्यवस्थित राहण्यास मदत होतं. अरबी खाल्ल्यामुळे गॅस, बद्धकोष्ठता आणि जुलाब यांसारख्या पोटाशी संबंधित समस्या कमी होण्यास मदत होऊ शकते.

Foods for better digestion
Liver Transplant Signs: लिव्हर फेल होत असल्याचे ‘हे’ संकेत वेळीच ओळखा; जाणून घ्या ट्रान्सप्लांटची वेळ आलीय का?

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com