Face Care Tips
Face Care Tips Saam Tv

Face Care Tips : व्हाईट हेड्सपासून त्रस्त आहात स्वयंपाकघरातील 'हा' पदार्थ ठरेल फायदेशीर!

बऱ्याच वेळा हळद औषधांचे काम करत असते म्हणून याला आयुर्वेदिक औषधी वनस्पती म्हणतात.
Published on

Face Care Tips : बऱ्याच वेळा हळद औषधांचे काम करत असते म्हणून याला आयुर्वेदिक औषधी वनस्पती म्हणतात. अँटीमायक्रोबीयल, अँटीऑक्सिडेंट ,अँटी-इन्फ्लेमेंटरी या गुणधर्मने हळद समृद्ध असते.

चेहरा सुंदर दिसण्यासाठी लग्नाच्या (Wedding) एक दिवस अगोदर आपण हळदीचा कार्यक्रम ठेवतो त्यामुळे चेहऱ्याचा रंग सुधारण्यास मदत होते आणि तुम्ही लग्नाच्या दिवशी छान दिसता. तसेच हळदीचा (Turmeric) वापर करून इतर दिवशीही तुमचा चेहरा छान दिसावा म्हणून हा फेस पॅक बनवून वापरा.

तुम्ही नैसर्गिकरित्या तुमची त्वचा चमकदार बनवू शकता. याव्यतिरिक्त त्वचेच्या कोणत्याही समस्या या फेसपॅकने दूर होतील चला तर मग हा फेस पॅक बनवण्याची पद्धत समजून घेऊ.

Face Care Tips
Face Care Tips : अधिक सुंदर दिसण्यासाठी फक्त चेहऱ्यावर 'हे' अप्लाइ करा!

हळदीचा फेस पॅक बनवण्यासाठी आवश्यक साहित्य -

हळदी पावडर १/२ टीस्पून, मध १ टीस्पून

हळद फेस पॅक बनवण्याची पद्धत -

हळद चा वापर करून फेसपॅक बनवण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी एका लहान वाटीत एक चमचा हळद आणि एक चमचा मध टाकून दोन्ही गोष्टी छान मिसळून घ्या तयार आहे तुमचा हळदीचा फेस पॅक.

Face Care Tips
Face Care Tips : 'या' फेस सीरमने होतील चेहऱ्यावरचे डाग गायब, लगेचच ऑर्डर करा

आता हळदीचा फेस पॅक वापरायचा कसा आहे समजून घेऊया -

हा फेस मास्कचा वापर करण्याआधी आपला चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या त्यानंतर चेहरा पुसून हा मास्क पूर्ण चेहऱ्यावर लावून घ्या. नंतर फेस मास्क चेहऱ्यावर सुमारे वीस मिनिटे लावून ठेवा जोपर्यंत हे कोरडे होत नाही.

तोपर्यंत चेहऱ्यावरच ठेवा तुमच्या चेहऱ्यावरील व्हाईट हेड्स दूर करण्यासाठी हा मास्क खूप उपयुक्त ठरेल.जर तुमची त्वचा कोरडी पडत असेल तर ती समस्या ही दूर होईल आणि तुमचा चेहरा चमकायला लागेल आणि पूर्वेपेक्षा अधिक तुमची स्कीन चांगली दिसेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com