Face Care Tips
Face Care Tips Saam Tv

Face Care Tips : अधिक सुंदर दिसण्यासाठी फक्त चेहऱ्यावर 'हे' अप्लाइ करा!

प्रत्येक स्त्रीला सुंदर आणि सतेज कांती हवी असते.

Face Care Tips : प्रत्येक स्त्रीला सुंदर आणि सतेज कांती हवी असते. चेहऱ्यावरती कुठलाही प्रकारचे डाग, किंवा फोडया येणे हे कोणत्याच स्त्रीला आवडत नाही. परंतु बदलत्या जीवनशैलीमुळे आणि अनियमित खानपणामुळे स्त्रियांच्या चेहऱ्यावरचे तेज दिवसेंदिवस काय होत चालले आहे.

त्याचबरोबर थंडीच्या दिवसांमध्ये देखील अनेक महिलांची त्वचा कोरडी पडलेली असते. तुम्हाला अशा काही घरगुती टिप्स सांगणार आहोत. ज्याने तुमची त्वचा कायम चमकत राहील.

दैनंदिन जीवनातील धावपळीमुळे बऱ्याच स्त्रियांना स्वतःच्या आरोग्याची त्याचबरोबर स्वतःच्या त्वचेची काळजी घेण्यास वेळ मिळत नाही. अशातच अनेक स्त्रिया बाहेर काम करतात. त्यामुळे बऱ्याचदा उन्हामुळे त्यांची त्वचा काळी पडते.

त्याचबरोबर चेहऱ्यावर suntan देखील दिसून येतो. त्वचा (Skin) पूर्णपणे काळी पडलेली असते त्याचबरोबर. चेहरा पूर्णपणे निस्तेज झाल्यासारखा दिसू लागतो. एवढेच नाही तर थंडीच्या दिवसांमध्ये अनेक स्त्रियांना कोरड्या त्वचेमुळे विविध प्रकारचे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. त्याचबरोबर अनेक स्त्रिया (Women) बाजारातील केमिकल प्रोडक्ट्सचा वापर करतात.

या प्रॉडक्ट्सच्या वापरामुळे प्रॉडक्टमधले केमिकल आपल्या त्वचेमध्ये जाऊन आपली त्वचा खराब होऊ शकते. त्यामुळे केमिकल्स प्रॉडक्ट चा वापर न करता तुम्ही तुमच्या घरामधील काही गोष्टींचा वापर करून तुझा चेहरा मुलायम, सुंदर, आणि चमकदार बनवू शकता.

Face Care Tips
Face Care Tips : 'या' फेस सीरमने होतील चेहऱ्यावरचे डाग गायब, लगेचच ऑर्डर करा

1. दही -

दही तुमच्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असते. चेहर्यासाठी नॅचरल गोष्ट वापरायची असेल तर तुम्ही दह्याचा वापर करू शकता. दया मध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्वे उपलब्ध असतात. त्याचबरोबर दह्यामध्ये मॉइश्चरायझिंग आणि ब्लिचिंग चे गुणधर्म असतात.

जे तुमच्या चेहऱ्याची त्वचा उजळविण्यासाठी मदत करतात. म्हणूनच नाही हे तुमच्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. तुमच्या चेहऱ्यावर जर सुरकुत्या असतील तर त्याच्या वापराने त्या कमी होतील. त्यामुळे दही आधी हातावरती घेऊन.

बोटांच्या सहाय्याने चेहऱ्यावरती मसाज करायचा आहे. त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन काढायचा आहे. तुम्हाला दह्याचा वापर आठवड्यातून एकदा करायचा आहे. तेव्हाच तुमच्या चेहरा चमकदार आणि सुंदर दिसू शकेल.

2. मध -

मधामध्ये ब्लिचिंग आणि मॉइश्चरायझिंगचे गुणधर्म भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. बाहेर काम करणाऱ्या महिलांसाठी म्हणजेच सूर्याच्या किरणांमुळे अनेक महिलांची त्वचा खराब होते. त्यांची त्वचा काळी पडू लागते आणि डलं दिसू लागते.

त्याचबरोबर वाढत्या प्रदूषणाचा प्रभाव देखील आपल्या त्वचेवर लगेच दिसून येतो. त्यामुळे मधाचा वापर करून तुमची त्वचा उजळवू शकता. मधामध्ये अँटिफॅक्टरियल सारख्या गुणधर्मांचा समावेश असतो. जे तुमच्या स्किन सेल्सला रिपेअर करण्याचे काम करतात.

चेहरा स्वच्छ धुऊन मधाची एक पातळ लेयर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती लावायची आहे. सात ते दहा मिनिटांनंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन काढायचा आहे. मधाच्या सतत वापराने तुमच्या चेहऱ्यावरील सगळे प्रॉब्लेम्स दूर निघून जातील.

Face Care Tips
Face Wrinkles : सुरकुत्यांना वेळीच थांबवायचे आहे ? तर 'या' घरगुती फेस पॅक चा वापर करा

3. पपई -

पपई आपल्या त्वचेसाठी त्याचबरोबर आरोग्यासाठी देखील अत्यंत फायदेशीर असते. पपई हे फळ स्किन केअर साठी सर्वात पहिल्या नंबर वर आहे. पपई आपल्या स्किनला हेल्दी बनवते त्याचबरोबर चमकदार देखील बनवते.

तुम्ही रोज तुमच्या स्किनला पपई लावली तर तुमची त्वचा अत्यंत सुंदर आणि चकाकणारी दिसेल. पपई पासून तुम्ही फेस स्क्रब देखील करू शकता. त्याचबरोबर तुम्ही पपईचा फेस पॅकही बनवू शकता. त्याचबरोबर पपई तुम्ही तुमच्या डायटमध्ये शामिल करू शकता. सतेज कांतीसाठी वापरून पहा घरामधील या गोष्टी, त्वचा राहील कायम चमकदार आणि मुलायम

4. कोरफडीचा गर -

कोरफडीचा घर हा तुमच्या चेहऱ्यासाठी अत्यंत फायदेशीर असतो. कोरफडीमुळे तुमचे अनेक स्कीन प्रॉब्लेम्स दूर निघून जातील. तुमच्या चेहऱ्यावरती जर पिगमेंटेशन असतील तर तुम्ही रोज कोरफडीचा गर चेहऱ्यावरती लावला पाहिजे.

बाजारामध्ये वेगवेगळ्या ब्रँडचे एलोवेरा जेल उपलब्ध असतात ते देखील तुम्ही वापरू शकता. एलोवेरा जेल हे तुमची स्किन उजळविण्यासाठी मदत करते. एलोवेराजेलच्या सततच्या वापरामुळे तुमची स्किन हेल्दी राहण्यास मदत होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com