पावसाळ्यात पीठ खराब होत असेल तर हे उपाय करुन पहा

पावसाळ्यात पीठाला किड लागत असेल तर या टिप्स फॉलो करा
How To Store Flour To Prevent Bugs, Best Ways To Store Flour, Food Storage Tips During Monsoon Season
How To Store Flour To Prevent Bugs, Best Ways To Store Flour, Food Storage Tips During Monsoon Season ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Published On

मुंबई : पावसाळा सुरू झाला की, वातावरणात गारवा पसरतो त्यामुळे स्वयंपाकघरातील किंवा आपल्या घरातील इतर ठिकाणी दमट हवामान तयार होते. पावसाळ्यात घरात माशा, किडे व किटकुलही येतात. (How To Store Flour To Prevent Bugs)

हे देखील पहा -

पावसाळ्यात (Monsoon) अधिकतर परिणाम आपल्या स्वयंपाकघरात होतो. वातावरणातील बदलामुळे आपल्या स्वयंपाकघरातील पदार्थांना किड लागते. त्यामुळे त्या पदार्थांना टाकून द्यावे लागते. तांदूळ व पिठाला किड लागते. त्यांना कधीकधी बाहेर काढणे कठीण होते. अशावेळी आपल्या स्वयंपाकघरात ठेवलेल्या भाज्या, मसाले आणि धान्ये व्यवस्थित साठवून ठेवणे गरजेचे आहे. पीठात जर आपल्याला किड लागलेली दिसत असेल तर पीठ लवकर खराब होईल. आपण या गोष्टीची काळजी घेतली तर पीठाला कीड लागणार नाही व ते लवकर खराबही होणार नाही.

१. आपल्यापैकी अनेकांना सवय असते की आपण पीठ पॅकेटमध्ये ठेवतो आणि गरजेनुसार बाहेर काढतो. पीठ हे आपण पॅकेटमधून काढून हवाबंद डब्यात ठेवा. यामुळे पिठात ओलावा राहणार नाही आणि पिठात किडे किंवा माइट्स येणार नाही. तसेच, पीठ ओलसर ठिकाणी ठेवणे टाळा.

How To Store Flour To Prevent Bugs, Best Ways To Store Flour, Food Storage Tips During Monsoon Season
स्वयंपाकघरातील या मसाल्याने दूर होतील आरोग्याच्या समस्या

२. डब्यात पीठ ठेवल्यानंतर आपण त्यात ३ ते ४ तमालपत्र ठेवावे. याच्या सुंगधामुळे किड लागणार नाही व पीठ देखील खराब होणार नाही. तसेच यात ७ ते ८ कढीपत्ता देखील ठेवू शकतो. नेहमी पिठाचा डब्बा हा हवाबंद ठेवावे. (Best Ways To Store Flour In Monsoon Season)

३. आपण आपल्या स्वयंपाकघरात मसाले ठेवतो. हे मसाले केवळ स्वयंपाकातच नव्हे तर स्वयंपाकघरातील (Kitchen) अनेक कामांमध्येही वापरले जातात. लवंगा हे आपल्या पीठाला खराब होण्यापासून वाचवू शकते. ४ ते ५ लवंगा पिठाच्या डब्यात किंवा पॅकेटमध्ये ठेवून घट्ट बंद करा. लवंगाच्या वासामुळे पिठात किडेही फिरकणार नाहीत. तसेच, लवंगामुळे चपातीची चवही बदलेल.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com