Milk Side Effect : दूधासोबत 'हे' पदार्थ चुकूनही खाऊ नका; अन्यथा आयुष्यभर पश्चाताप होईल

This Food Avoid Eating With Milk : दूधासोबत काही पदार्थ खाल्ल्याने त्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे त्या पदार्थांबाबात अधिक माहिती जाणून घेऊ.
Milk Side Effect
Milk Side EffectSaam TV

दूध आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. दूधामध्ये अनेक पोषक तत्व आणि जीवनसत्व असतात. त्यामुळे रोजच्या आहारात किमानी रात्री झोपताना तरी अनेक व्यक्ती दूध पिऊन झोपतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का? दूधासोबत काही पदार्थ खाल्ल्याने त्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे त्या पदार्थांबाबात अधिक माहिती जाणून घेऊ.

Milk Side Effect
Cold Milk Benefits: उन्हाळ्यात थंड दूध पिण्याचे फायदे, घ्या जाणून

कांदा-लसून

दूध पित असताना त्याबरोबर लसून किंवा कांदा अशा गोष्टींचे सेवन करू नये. याने आपल्या शरीरात वेगळी प्रक्रिया होते आणि त्वाचेच्या काही गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही चुकूनही दूधा पिल्यानंतर त्यावर कांदा किंवा लसूनचे सेवन करू नका.

आंबट फळे

दूधामध्ये कधीही आंबट फळे किंवा त्यांचा ज्यूस मिक्स करू नका. त्याचाही आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. दूधामध्ये संत्री, लिंबू किंवा चिंच असे फळं खाणे टाळावे. त्याने पचनक्रियेवर विपरीत परिणाम होतो. तसेच पोटाशी संबंधित बऱ्याच समस्या उद्भवतात.

मासे

दूधासोबत मासे खाऊ नका. दूधासोबत मासे खाल्ल्याने त्याचाही आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. दूध आणि मासे एकत्र खाण्याऱ्या व्यक्तींना त्वचेते कायमस्वरुपी आजार होतात. त्यांना त्वचेवर कोड फुटते. त्यामुळे दूधावर मासे किंवा अन्य कोणत्याही प्रकारचे नॉनव्हेज खाऊ नका.

मीठ

दूधासोबत मीठ असलेले खारट पदार्थ खाऊ नका. त्याने तुम्हाला मळमळ आणि उलटी अशा समस्या उद्भवतील. तसेच अपचनाचा त्रास होईल. यासह डोकेदुखीच्या समस्यांचा देखील सामना करावा लागेल.

दूध आपल्या आरोग्यासाठी फार पैष्टीक आहे. दूधापासून बनवलेले विविध गोड पदार्थ देखील आपण आवडीने खातो. मात्र दूध आणि दूग्धजन्य गोड पदार्थांसोबत अन्य काही ठरावीक गोष्टी खाणे आवश्य टाळा. कारण हे दोन्ही पदार्थ फार वेगवेगळे असल्याने शरीरात गेल्यावर त्यावर वेगळी अभिक्रीया होते. अनेकांना असे कोणतेही पदार्थ खाल्ल्याने फूड पॉइजन देखील होते. त्यामुळे स्वत:च आपल्या आरोग्याची काळजी घ्या.

टीप : ही फक्त सामान्य माहिती आहे. तुम्हाला अन्य काही समस्या असल्यास डॉक्टरांचा आवश्य सल्ला घ्या.

Milk Side Effect
Hydrate Foods : उन्हाळ्यात डिहायड्रेशन होणारच नाही! डाएटमध्ये करा या पदार्थांचा समावेश

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com