Rohini Gudaghe
दूध थंडगार असल्याने ते प्यायल्यामुळे शरीर थंड राहते. दूध शरीराच्या गरजेनुसार कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, पोटॅशियमची गरज पूर्ण करते.
थंड दूध पिल्यामुळे अॅसिडिटी आणि पेप्टिक अल्सरमुळे होणारा त्रास कमी होतो.
जेवल्यानंतरही सारखी भूक लागत असेल तर थंड दूध पिणे हा उत्तम उपाय आहे.
थंड दूधामध्ये इलेक्ट्रोलाईट्स असतात. त्यामुळे डिहाड्रेशनपासून बचाव होतो.
थंड दूध प्यायल्यामुळे गॅस होत नाही. त्यामुळे अन्नपचनास मदत होते.
व्यायामानंतर थंड दूध पिणे फायदेशीर आहे. दुधात मसल्ससाठी आवश्यक प्रोटीन्स असतात. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.
चेहऱ्यावर थंड दूध लावल्यामुळे त्वचा स्वच्छ होते. त्वचा हाडड्रेट आणि मुलायम होते.
सदर लेख फक्त माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
NEXT: उन्हाळ्यात खा आंबट-गोड कैरी; उष्माघातापासून होईल संरक्षण