Belly Fat Loose : महिलांनो, वयाची 50 शी ओलाडल्यानंतर पोटाची चरबी कमी करायची आहे? आजपासूनच आहारात करा हे बदल, झरझर कमी होईल वजन

How To Loose Weight After 50 Age : कामाच्या गडबडीमुळे आपण जेवणाची वेळ व अनहेल्दी पदार्थ खातो. यामुळे आपले वजन लगेच वाढते.
Belly Fat Loose
Belly Fat LooseSaam tv
Published On

Women Weight Loss Tips : वय वाढले की, आपल्या शरीरात अनेक बदल होतात. वाढत्या वयानुसार आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी देखील बदलतात. कामाच्या गडबडीमुळे आपण जेवणाची वेळ व अनहेल्दी पदार्थ खातो. यामुळे आपले वजन लगेच वाढते.

वयाची ५० शी ओलाडल्यानंतर प्रत्येकाला वजन कमी करणे किंवा शरीर तंदुरुस्त ठेवणे कठीण होते. वयाच्या पन्नाशीत प्रवेश करत असाल तर ते मानसिक आणि शारीरिक दोन्ही दृष्टीने आव्हानात्मक काम असू शकते. वाढत्या वयानुसार आपण काही चुकीच्या सवयी सोडून दिल्या तर आपण आपले पोटाची चरबी कमी करु शकतो. जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर

Belly Fat Loose
Monsoon Hair Care : केसांच्या टाळूला सतत खाज लागते? पावसाळ्यात केस तेलकट व चिकट होतात? घरगुती उपाय ट्राय करुन पाहाच

1. सक्रिय राहा-

हेल्थलाइनच्या मते, जर तुम्हाला तुमच्या पोटाची चरबी (Belly Fat) कमी व्हावी आणि तुमचे वजन वाढू नये असे वाटत असेल, तर तुम्ही स्वतःला शक्य तितके सक्रिय ठेवणे महत्त्वाचे आहे. असे केल्याने तुमच्या कॅलरीज अधिक बर्न होतील आणि वजन नैसर्गिकरित्या कमी होण्यास सुरुवात होईल.

2. प्रथिनांचा आहारात समावेश

वयानुसार प्रथिनांचे सेवन वाढवले ​​तर तुमचे वजन कमी होईलच तसेच कमकुवत स्नायूंनाही मजबूत ठेवता येईल.

Belly Fat Loose
Copper Water Benefits : तांब्याच्या भांड्यात पाणी प्या, Diabetes नियंत्रणात ठेवा !

3. घरचे पदार्थ

बाहेरील तळलेले किंवा जंक फूड हे आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे. त्यासाठी घरी बनवलेले पदार्थांचे (Food) सेवन करा. तसेच खाण्यापिण्याच्या वेळा ही आपल्याला पाळायला हव्यात.

4. कॅलरीज मोजा

तुम्ही आहारात कोणते पदार्थ खाता यापेक्षा ते किती कॅलरीयुक्त आहे हे देखील तपासणे गरजेचे आहे. ज्यामुळे तुमचे वजन (Weight Loss) सहज कमी होऊ शकते. पोटाची चरबी कमी करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग असू शकतो.

Belly Fat Loose
Benefits Of Drinking Black Tea : सकाळी काळा चहा पिण्याचे फायदे तुम्हाला माहितेय का?

5. हायड्रेटेड राहा

स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी जास्तीत जास्त पाण्याचे सेवन करा. महिलांनी किमान दोन ते तीन लिटर पाणी पिणे आवश्यक आहे तर पुरुषांनी दिवसातून चार लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. यामुळे पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते.

6. कार्डिओकडे लक्ष द्या

कॅलरी बर्न करण्यासाठी जिम किंवा अधिक व्यायाम करण्याऐवजी तुम्ही कार्डिओ वर्कआउटवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. यासाठी चालणे, जॉगिंग, सायकलिंग, पोहणे इत्यादी करू शकता. यामुळे तुमच्या पोटाची चरबी कमी होण्यास खूप मदत होईल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com