Disney Plus Hotstar
Disney Plus HotstarSaam Tv

IND vs Pak मध्ये काट्याची टक्कर, 'मेगा इव्हेंट' या ठिकाणी फुकटात पाहा, कसं? जाणून घ्या!

Asia Cup 2023 : आज (2 सप्टेंबर) रोजी Asia Cup 2023 चा भारत विरूद्ध पाकिस्तान होणार आहे.
Published on

IND vs PAK, Asia Cup 2023 On Hoststar :

आज (2 सप्टेंबर) रोजी Asia Cup 2023 चा भारत विरूद्ध पाकिस्तान होणार आहे. हा आशिया चषक 19 दिवसांचा असून या सामन्याची मजा तुम्ही घरबसल्या ऑनलाइन घेऊ शकता.

भारत पाकिस्तान हा सामना चुकवायचा नसेल आणि तुम्ही कुठे बाहेर असाल तर तु्म्ही तो ऑनलाइन (Online) कसा पाहाल हे पाहूयात. हा आशिया चषक 2023 चे लाईव्ह स्ट्रीम मोफत कसे पाहता येईल, चला जाणून घेऊया...

Disney Plus Hotstar
IND VS PAK, Playing XI: भारत- पाकिस्तान सामन्यात सूर्याला संधी मिळणार? पाहा महामुकाबल्यासाठी टीम इंडियाची प्लेइंग 11

IND vs PAK, Asia Cup 2023 सामना मोफत कसा पाहायचा :

तुम्ही Disney + Hotstar मोबाईल अ‍ॅपवर HD मध्ये Asia Cup 2023 विनामूल्य पाहू शकता. Hostarने जाहीर केले आहे की ज्या युजर्सला सामने बघायची आहे त्यांना आधी त्यांच्या स्मार्टफोनवर (Smartphone) Hotstar इन्स्टॉल करावे लागेल आणि मग तुम्ही कोणत्याही मेंबरशिपशिवाय तेथे कोणतेही लाईव्ह सामना पाहू शकता.

Disney Plus Hotstar
New Year Recharge Offers: नवीन वर्षात मिळताय मोबाईल रिचार्जवर ऑफर, Hotstar आणि Amazon Prime मिळेल मोफत !

या स्टेप्स फॉलो करून लाईव्ह सामना पाहा :

स्टेप 1: तुमच्या फोनवर हे अ‍ॅप (App) आधीपासून नसेल, तर तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवर Disney + Hotstar अ‍ॅप डाउनलोड करावा.

स्टेप्स 2: नंतर Disney+ Hotstar अ‍ॅप उघडा.

स्टेप्स 3: सामना लाईव्ह असल्यास, सामना पाहण्यासाठी सुरवातील बॅनर निवडण्याचे पर्याय तुम्हाला दिसेल त्यातील तुम्हाला कोणता सामना निवडायचा आहे तो निवडा.

स्टेप्स 4: सर्वात खाली असलेल्या स्पोर्ट्स टॅबद्वारे सामन्यांमध्ये प्रवेश करता येणार आणि पाहता येईल.

तुम्हाला स्मार्टफोनवर एकही शुल्क न भरता हा सामना पाहता येईल, परंतू हाच सामना तुम्हाला टीव्ही आणि लॅपटॉपवर पाहायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला मेंबरशिप घ्यावी लागेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com