Summer Hair Care: उन्हाळ्यात केसांची काळजी कशी घ्यावी? फक्त फॉलो करा 'या' 2 स्टेप

Hair Care Tips: उन्हाळ्यात आठवडा भरातच तुमच्या केसांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. केस गळणे, चिकट होणे, केसांचा वास येणे अशा अनेक समस्यांपासून वाचण्यासाठी तुम्ही पुढील उपाय करू शकता.
Summer Hair Care: उन्हाळ्यात केसांची काळजी कशी घ्यावी? फक्त फॉलो करा 'या' 2 स्टेप
Summer Hair Caregoogle
Published On

वाढत्या उन्हामुळे पुर्ण शरीर घामाने ओलं होत असतं. त्याच पद्धतीने केसांमध्ये सुद्धा प्रचंड घाम यायला सुरुवात होते. त्याने केसांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. उन्हाळ्यात केस प्रचंड गळतात. तसेच केसात घामाचा वास येतो, केस चिकट होतात, केस बांधून ठेवल्याने केसात घाम साचतो. त्यामुळे उन्हाळ्यात केसांची विशेष काळजी घेतली पाहिजे. त्याबद्दल आपण पुढे जाणून घेणार आहोत.

उन्हाळ्यात केसांचे होणारे नुकसान

सुर्याच्या किरणांचा तुमचे त्वचेवर जसा परिणाम होतो. तसाच परिणाम तुमच्या केसांवर होत असतो. सुर्याच्या किरणांमध्ये अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे आपल्या केसांचे नुकसान होते. त्यामुळे उन्हाळ्यात आठवडा भरातच तुमच्या केसांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यासाठी पुढे आपण उन्हाळ्यात केसांची काळजी कशी घ्यावी? याबद्दल जाणून घेणार आहोत.

Summer Hair Care: उन्हाळ्यात केसांची काळजी कशी घ्यावी? फक्त फॉलो करा 'या' 2 स्टेप
Chanakya Niti For Relationship: नवरा पत्नीला कधी सोडतो? जाणून घ्या त्यामागची कारणे

उन्हाळ्यात केसांची काळजी कशी घ्यावी?

उन्हाळ्यात केस बांधून ठेवणं टाळलं पाहिजे. तसेच तुम्ही केसांना हेअर स्प्रे, जेल किंवा विविध क्रिम ज्याने तुमचे केस गळणार नाहीत. कोरडे होणार नाहीत अशा प्रोटक्ट्सचा वापर करा. तसेच तुम्ही केस धुताना कंडीशनरचा जास्त प्रमाणात वापर करू शकता. तुम्ही उन्हाळ्यात जास्त वेळ बाहेर प्रवास करत असाल तर टोपीचा वापर करा. सुर्याच्या तापत्या किरणांपासून केसांना नेहमी वाचवण्याचा प्रयत्न करा. त्याने तुमच्या टाळूचे आणि कानांचेही संरक्षण होईल.

केसाना मॉइश्चरायझिंग करा

उन्हाळ्यात केसांमध्ये खूप घाम साचतो. त्याने तुमचे जास्त चिकट होतात. त्यामुळे आठवड्यातून किमान ३ वेळा केस स्वच्छ थंड धुवा. केसांना तुम्ही शॅम्पूचा वापर करा. तसेच केसांमधली घाण काढण्यासाठी क्लिंजिंग किंवा अॅंटी-रेसिड्यू शॅम्पू वापरा. मात्र डीप-कंडीशनिंग ट्रीटमेंट हा उन्हाळ्यात उत्तम पर्याय असू शकतो.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Summer Hair Care: उन्हाळ्यात केसांची काळजी कशी घ्यावी? फक्त फॉलो करा 'या' 2 स्टेप
Ghibli Style Image तयार करताना तुमचे खासगी फोटो सुरक्षित आहेत का? वाचा संपुर्ण माहिती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com