Crossword Puzzle : बुद्धीला जोर द्या! मिनिटात सोडवा मराठी शब्दकोडे

Marathi Crossword Puzzle : स्क्रीन टाईम वाढल्याने शब्दकोडी कुठेतरी लोप पावली आहेत. मात्र अनेकांना शब्दकोडी सोडवणे आजच्या डिजिटल जगातही तितकच आवडतं.
Crossword
CrosswordSaam TV
Published On

Crossword Puzzle :

लहानपणी आजोबा किंवा बाबांना वर्तमानपत्रात  शब्दकोडे  सोडवताना पाहिलेच असेल. सध्या हे शब्दकोडे आपल्याला लोप पावताना दिसत आहे. पूर्वी वृत्तपत्रांमध्ये शब्द कोड्यांना विशिष्ट अशी जागा पाहायला मिळायची.

शब्द कोड्यांमुळे मेंदूला चालना मिळते. बुद्धी अधिक जलद गतीने चालते. हा मनोरंजनाचा खेळ असला तरी अनेकांच्या आवडीचा आहे. हल्ली लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकजण सरार्स गेम खेळताना दिसतात. पण तुम्हालाही तुमच्या मुलांना हुशार बनवायचे असेल तर डिजिटल युगातील शब्दकोड्यांची मदत घेऊ शकतात. आता ही शब्द कोडे तुम्ही  ऑनलाईन पद्धतीने सोडवू शकता.

1. कशी असतील शब्दकोडी?

ऑनलाईन शब्दकोडे लहान, मध्यम, मोठे, अजून मोठे, अजून अजून मोठे या पर्यांयांमध्ये उपलब्ध असणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या वेळेनुसार पर्याय निवडू शकणार आहात. तसेच शब्दकोडी विविध प्रकारची असणार आहे.

यामध्ये सर्वसमावेशक, मजेशीर, शब्दकोश, सामन्य ज्ञान, मराठी-इंग्रजी, इंग्रज-मराठी, स्पर्धा परीक्षा, घोटाळे ओळखा? असे तुमच्या आवडीचे विषय तुम्ही निवडू शकता.

अशी रितीने अनेकांना एका वेगळ्या रुपात आपला छंद जपता येणार आहे. यामुळे मेंदूचा व्यायामही होणार आहे. ऑनलाईन शब्दकोडे सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

https://crosswordhouse.com/

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com