Veg Sandwich Recipe : ५ मिनिटात नाश्ता तयार करायचा आहे? तर पटकन व्हेज सँडविच बनवा, जाणून घ्या रेसिपी

Veg Sandwich Recipe in marathi : खरंतर अनेकांना ऑफिसमध्ये जाताना नाश्ता करण्यास वेळ मिळत नाही. त्यामुळे कमी वेळेत नाश्ता तयार करायचा आहे, तर तुमच्यासाठी व्हेज सँडविच बनवणे एक चांगला पर्याय आहे.
Sandwich
SandwichSaam TV

veg sandwich Recipe :

सकाळच्या सुमारास तुम्ही चांगला नाश्ता केल्यास तुम्हाला दिवसभर उर्जा मिळते. खरंतर अनेकांना ऑफिसमध्ये जाताना नाश्ता करण्यास वेळ मिळत नाही. त्यामुळे कमी वेळेत नाश्ता तयार करायचा आहे, तर तुमच्यासाठी व्हेज सँडविच बनवणे एक चांगला पर्याय आहे.

व्हेज सँडविच हा नाश्त्यासाठी उर्जादायी पदार्थ आहे. तुम्ही सँडविच काही मिनिटात तयार करू शकता. काही विशिष्ट पद्धतीने सँडविच तयार केल्यास, तुम्ही या सँडविचचे 'दिवाने' व्हाल. हे सँडविच बनविण्यासाठी कोणते साहित्य लागेल, याची माहिती जाणून घेऊयात.

वेज सँडविचसाठी कोणतं साहित्य लागेल?

व्हेज सँडविच बनविण्यासाठी ब्रेडचे ८ स्लाइस घ्या. तसेच १/२ शिमला मिरची, १ काकडी, १ गाजर, १ शिजवेला बटाटा, १ कांदा, १०० ग्रॅम पनीर, ४ चीज स्लाइस, ४ चमचे मेयोनिस, चवीनुसार मीठ, १ चमचा काळी मिरी पावडर, टोमॅटो सॉस, ग्रीन चिली सॉसची गरज लागेल.

Sandwich
Food for Dehydration : कलिंगड, काकडी नाही तर 'या' पदार्थांमुळे शरिराला मिळेल हायड्रेशन

व्हेज सँडविच तयार करण्याची सोपी पद्धत

व्हेज सँडविच तयार करण्यासाठी काकडी, कांदा, शिमला मिरचीचे स्लाइस करून घ्या. गाजरचा किस करून शिजवलेल्या बटाट्यामध्ये मॅश करू घ्या.

या सर्व पदार्थ एका भांड्यात घ्या. त्यानंतर पनीरचा किस करून त्यात मेयोनिस मिक्स करून घ्या. पुढे ब्रेडचा स्लाइस काढून त्यावर पदार्थ ठेवावे लागतील. या ब्रेड स्लाइसवर थोडे तेल टाकून गरम करून घ्या. त्यानंतर त्यावर टोमॅटो सॉस, मीठ, काळी मिरीची पावडर टाका. पुढे ब्लेडच्या स्लाइसला प्लेटमध्ये ठेवा. एका बाजूवर व्हेजिटेबल मिक्सर ठेवा. त्यानंतर दुसरा स्लाइस त्यावर ठेवा. पुढे त्याला ओव्हनमध्ये ठेवा.

Sandwich
Summer Food : उन्हाळ्यात या पदार्थांचे अतिसेवन ठरु शकते आरोग्याला हानिकारक, वेळीच खाणे टाळा!

ओव्हनमध्ये ठेवल्यावर काही मिनिटात कुरकुरीत सँडविच तयार होईल. तुम्ही हे सँडविच टोमॅटो सॉस किंवा चिली सॉससोबत खाऊ शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com