Kombdi Vade Recipe: गटारीनिमित्त घरीच बनवा टम्म फुगलेले कोंबडी वडे, नॉनव्हेजचा बेत होईल भारी

Kombdi Vade Homemade Recipe: गटारी निमित्त घरीच बनवा पारंपरिक फुललेले कोंबडी वडे. सोपी रेसिपी, घरगुती चव आणि नॉनव्हेजसोबत भन्नाट आनंद. प्रत्येक घासात अस्सल मराठमोळा स्वाद.
Kombdi Vade Recipe
Kombdi Vade RecipeSaam Tv
Published On

अवघ्या दोन दिवसांमध्ये श्रावण महिन्याला सुरूवात होणार आहे. श्रावण महिन्याआधी गटारी अमावस्या साजरी केली जाते. गटारी अमावस्येला सर्वजण नॉनव्हेजचा बेत आखतात. या दिवशी कुटुंब, मित्रमैत्रिणी परिवारासोबत एकत्र येऊन नॉन व्हेजवर ताव मारतात. या दिवशी नॉनव्हेजचे विविध पदार्थांसोबत खास कोंबडी वडे बनवले जातात. कोबडी वडे घरच्या घरी बनवण्याची रेसिपी आज आपण जाणून घेऊयात.

Kombdi Vade Recipe
Gatari Amavasya 2025: श्रावणाआधी गटारी का साजरी करतात? कारण जाणून व्हाल थक्क

नॉनव्हेजसोबत कोंबडी वडे खाण्याची मज्जाच वेगळी असते. पूर्वी फक्त घरीच कोंबडी वडे बनवण्याची पद्धत होती. मात्र आता हॉटेलमध्ये देखील कोंबडी वडे मिळतात. अशातच अनेक महिलांना घरी कोंबडी वडे कसे बनवायचे ही रेसिपी माहित नाही आहे. मात्र यंदा तुम्ही गटारीनिमित्त घरीच कोंबडी वडे बनवू शकता.

Kombdi Vade Recipe
Solkadhi Recipe: नॉनव्हेज जेवणानंतर प्या थंडगार सोलकढी, सोपी रेसिपी वाचा

कोंबडी वडे बनवण्यासाठी नेमके कोणते साहित्य लागणार आहे हे पाहूया.

  • साहित्य

तांदूळ, धने, मेथी, चण्याची डाळ, उडदाची डाळ, बडीशेप, जीरे, कांदा, हिरवी मिरची, आलं, लसूण, मीठ, हळद, तेल

Kombdi Vade Recipe
Rava Thalipeeth Recipe : फक्त १० मिनिटांत बनवा गरमा गरम, कुरकुरीत रवा थालीपीठ, खवय्यांची खास पसंती

कोंबडी वडे बनवण्याची स्टेप बाय स्टेप रेसिपी

  • कोंबडी वडे बनवण्यासाठी सर्वप्रथम तांदूळ स्वच्छ धुवून त्याचे पीठ दळून घ्या. यानंतर चण्याची डाळ, उडीद डाळ भिजत घाला आणि बारीक वाटून घ्या.

  • कांदा, मिरची, आलं, लसूण एकत्र वाटून घ्या.

  • वडे बनवण्यासाठी तांदळाच्या पिठात दळलेल्या डाळी, धने, बडिशेप, मीठ एकत्र करा.

  • पीठ भिजवताना कोमट पाणी वापरावे. पीठामध्ये तुम्ही कांदा बारीक कापून घालू शकता.

  • पीठ मळून झाल्यानंतर एक ते दीड तास पीठ झाकून ठेवा. यामुळे पीठ चांगले फुलून येईल.

  • वडे थापण्यासाठी तुम्ही केळीच्या पानांचा किंवा प्लास्टिकच्या पानांचा देखील वापर करू शकता.

  • पानांला किवा प्लास्टिक तेल लावून पीठाचा गोळा घेऊन तो तेलावर थापून घ्या.

  • आता वडे तळण्यासाठी गॅसवर कढईत गरम तेलामध्ये वडे तळून घ्या.

  • नॉनव्हेजसोबत कोंबडी सर्व्हसाठी तयार होतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com