Siddhi Hande
श्रावण सुरु व्हायला अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळे अनेकांच्या घरात नॉन व्हेजचा बेत असतो.
नॉन व्हेज जेवणानंतर सोल कढी ही प्यायलाच हवी. सोल कढी ही अत्यंत चविष्ट असते.
सोल कढी बनवण्यासाठी सर्वात आधी कोकम गरम पाण्यात भिजत ठेवा.
यानंतर नारळ फोडून त्याचे बारीक तुकडे करा. आणि मिक्सरमध्ये बारीक करा.
वाटलेल्या नारळावर पाणी टाका आणि त्याचे घट्ट दूध कापडातून गाळून घ्या.
यानंतर हिरवी मिरची, आलं-लसूण आणि जिरं मिक्सरमध्ये बारीक करा.
एका भांड्यात नारळाचे दूध, हिरव्या मिरचीची मिश्रण, कोकमचा रस गाळून टाका.
त्यात मीठ आवश्यकतेनुसार पाणी टाका.
कढईत एक चमचा तेल गरम करुन त्यात मोहरी, हिंग आणि कढीपत्त्याची फोडणी द्या.
यानंतर ही फोडणी सोलकढीत टाका. यानंतर त्यावर कोथिंबीर टाकून मस्त सजवा.
सोलकढीत थोडा बर्फ टाकून फ्रिजमध्ये ठेवा.
Next: चॉपस्टिक्सचा शोध कधी आणि का लागला? जाणून घ्या त्यामागील खरे कारण