Sakshi Sunil Jadhav
रवा थालीपीठ रेसिपी गरमा गरम कुरकुरीत थालीपीठ बनवण्याची झटपट रेसिपी पुढे देण्यात आली आहे.
रोजच्या नाश्त्यात इडली, पोहे खाण्याचा कंटाळा असेल तर तुम्ही रव्याचे थालीपीठ तयार करू शकता.
रवा, ओले खोबरे, कांदा, मिरची, मीठ, पाणी, तेल, साखर, अदरक, कोथिंबीर इ.
एका भांड्यात नारळ, कांदा, मिरची कोथिंबीर,मीठ, साखर एकत्र मळून घ्या.
पुढे रवा आणि पाणी घालून पीठ रात्रभर झाकून ठेवा.
रवा पाणी शोषून घेतल्यावर नॉन स्टीकच्या तव्यावर तेल लावून घ्या.
आता एक चमचा पीठ तव्यावर ठेवा आणि डोश्याप्रमाणे पसरवून घ्या.
मध्ये छिद्र करायला विसरु नका. बाजूने तेल पसरवा.
आता कुरकुरीत थालीपीठ १० मिनिटांत तयार होईल. हे तुम्ही दहीसोबत खाऊ शकता.