Sakshi Sunil Jadhav
पावसाळ्यात बऱ्याच पालेभाज्या बाजारात उपलब्ध असतात.
तुम्ही कांद्याच्या पातीपासून चमचमीत चटणी करून भाकरीसोबत खाऊ शकता.
कांद्याची पात, लाल तिखट, मीठ, कोथिंबीर, तेल, शेंगदाण्याचा कूट, लसूण, हळद, काळीमिरी पावडर, गूळ, लिंबाचा रस इ.
सगळ्यात आधी कांद्याची पात बारीक चिरून घ्या.
आता एका मोठ्या भांड्यात चिरलेला कांदा, कोथिंबीर, किसलेलं आलं, शेंगदाणे, पांढरे तीळ मीठ मिक्स करा.
आता हळद, मसाला, काळीमिरी पूड, बारीक लसूण मिक्स करा.
पुढे मिश्रणात थोडासा गूळ मिक्स करा. कढई तापवा.
तेल तापवा आणि सगळं मिश्रण एकत्र मिक्स करून घ्या.
तयार मिश्रण ५ मिनिटे वाफवून पुन्हा एकदा मिक्स करा. आणि गरमा गरम भाकरीसोबत सर्व्ह करा.