Sakshi Sunil Jadhav
लहान मुलांना कमीत कमी साहित्यात त्यांच्या आवडीचे नाचोस करून देऊ शकता.
कुरकुरीत नाचोस खाताना तुम्हाला बाहेरच्या खाण्याची अजिबात चव येणार नाही.
रात्रीची उरलेली पोळी, तेल, हळद, लाल तिखट, मीठ, चाट मसाला, सॉस इ.
सगळ्यात आधी चपाती छान त्रिकोणी आकारात कापून घ्या.
आता चपातीच्या तुकड्यांना थोडं तेल लावून घ्या.
पुढे चपातीवर हळद, मीठ, मसाले शिंपडून घ्या.
संपू्र्ण तुकडे तव्यावर मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.
आता एका प्लेटमध्ये नाचोस काढा. खाली कागदाचा वापर करा.
चपात्यांमधले तेल कमी झाले की सॉससोबत नाचोस सर्व्ह करा.