Garam Masala at Home : घरच्याघरी बनवा स्वादिष्ट आणि चविष्ट बाजारात मिळतो तसा गरम मसाला; भाजीची चव १० पटीने वाढेल

How to Make Garam Masala at Home : मसाल्यांमध्ये भेसळ असण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्हीही असे भेसळयुक्त मसाले वापरत असाल तर आजच हे मसाले घरीच कसे बनवायचे याची माहिती जाणून घेऊ.
How to Make Garam Masala at Home
Garam Masala at HomeSaam TV
Published On

भारत देश विविध संस्कृतीसह येथील लज्जतदार गरम मसाल्यांमुळे सुद्धा ओळखला जातो. भारतीय गरम मसाल्यांचे परदेशातही अनेक चाहते आहेत. जेवणाची चव वाढवण्यासाठी पूर्वी विविध खडे मसाले वापरले जात होते. आता अनेक महिला बाजारात मिळणारे विविध मसाल्यांचे पाकिट भाजीमध्ये मिक्स करतात. मग छोले असो अथवा पनीर प्रत्येक भाजीसाठी बाजारात वेगवेगळ्या मसाल्याचे पाकीट मिळते.

How to Make Garam Masala at Home
Masala Taak Benefits: जेवणानंतर ताक प्यायल्याने काय फायदा होतो?

पदार्थांमध्ये गरम मसाला असल्यास जेवण अतिशय चविष्ट लागतं. त्यामुळे तुम्ही सुद्धा पदार्थांमध्ये गरम मसाले वापरत असाल. बाजारात विविध पाकिटांमध्ये मिळणारे गरम मसाले पूर्णता शुद्ध नसतात. यातील अनेक मसाल्यांमध्ये भेसळ असण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्हीही असे भेसळयुक्त मसाले वापरत असाल तर आजच हे मसाले घरीच कसे बनवायचे याची माहिती जाणून घेऊ.

साहित्य

२ चमचे जिरं

३ चमचे धणे

१ चमचा हिवरी वेलची

१ चमचा बेडकी मिरची

२ ते ३ दालचीनीचे तुकडे

४ ते ५ तेजपत्ता

१ जायफळ

१ चमचा बडीशेप

कृती

सर्वात आधी साहित्यात दिलेले सर्व मसाले एका भांड्यात घेऊन छान भाजून घ्या. मसाले भाजताना गॅस जास्त फास्ट करू नका. गॅस लो फ्लेमवर ठेवा. त्यावरच सर्व मसाले हलके भाजून घ्या. असे केल्याने मसाले छान कडक होतात. त्यानंतर एका प्लेटमध्ये सर्व मसाले काढून घ्या आणि थंड होण्यासाठी ठेवा.

मसाले नॉर्मल झाले की ते मिक्सरला बारीक करून घ्या. मसाले बारीक करताना सर्व एकत्र बारीक करू नका. आधी थोडे थोडे मसाले मिक्सरमध्ये बारीक करा. असे केल्याने तुम्हाला मस्त बारीक मसाला बनवता येईल. पुढे हा मसाला बारीक झाला की एका चाळणीने तो चाळून घ्या.

मसाला छान बारीक झाल्यावर एका कचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा. या मसाल्याला अजिबात हवा लागणार नाही याची काळजी घ्या. त्यासाठी काचेची बरणी उत्तम आहे. या काचेच्या बरणीमध्ये एक हिंगाचा खडा सुद्धा ठेवा. त्याने मसाला खराब होणार नाही.

How to Make Garam Masala at Home
Masala Papad- टेस्टी अन् चटपटीत मसाला पापड आरोग्यासाठी आहे फायदेशीर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com