Fast Eating Habit : तुम्ही अवघ्या १५ ते २० मिनिटात जेवण संपवतात? तुमच्या या सवयींमुळे येऊ शकतात अडचणी

Fast Eating Habit : अन्न नेहमी हळूहळू खाल्ले पाहिजे. पटकन खाणे म्हणजे अनेक रोगांना आमंत्रण देण्यासारखं आहे. त्याचा आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होतो. आयुर्वेद आणि विज्ञानानेही घाईघाईने अन्न खाण्यास मनाई केली आहे.
Fast Eating Habit : तुम्ही अवघ्या १५ ते २० मिनिटात जेवण संपवतात? तुमच्या या सवयींमुळे येऊ शकतात अडचणी
Fast Eating Habit longevity
Published On

आजकाल कोणाकडेच रिकामा वेळ नाहीये. त्यामुळे प्रत्येक जण धावपळीत असतो. आपल्याकडे एवढाही वेळ नसतो की आपण अन्न शांतपणे ग्रहण करू. जेव्हा आपण घाई-घाईत जेवण करतो तेव्हा आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळी टोकत असतात. जेवण शांतपणे करा, असा सल्ला ते देतात परंतु आपण त्याकडे लक्ष देत नाहीत. पण आपल्या पटापट अन्न खाण्याच्या सवयीमुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. विशेष म्हणजे आयुर्वेदातही अन्न हळू-हळू खाण्याचा सल्ला दिलाय.

विज्ञानानुसार, भराभर जेवण केल्याने अन्नासोबत हवाही शरीरात जात असते. त्यामुळे गॅस आणि ब्लोटिंगची समस्या उद्भवू लागते. जर तुम्हीही पटापट अन्न खात असाल तर तुम्हाला घाईने खाण्याचे दुष्परिणाम देखील माहिती असले पाहिजेत.

वजन वेगाने वाढते Weight gain

विज्ञानानुसार, जेव्हा आपण अन्न खातो तेव्हा मेंदू २० मिनिटांनंतर पोट भरल्याचा सिग्नल पाठवतो. जेव्हा अन्न पटकन खाल्ले जाते, तेव्हा मेंदू हा सिग्नल विलंबाने पाठवतो, ज्यामुळे जास्त अन्न खाल्ले जाते. त्यामुळे वजन वाढण्याची आणि लठ्ठपणाची समस्या उद्भवू शकते.

मधुमेह Diabetes

पटापट खाणाऱ्यांना मधुमेह होण्याची शक्यता असते. हा आजार होण्याचे शक्यता मंद गतीने खाणाऱ्यांच्या तुलनेत अडीच पटीने जास्त असते. यामुळे रक्तातील साखर आणि इन्सुलिनची पातळी खालावते, यामुळे टाइप २ मधुमेहाचा धोका वाढतो.

इन्सुलिन प्रतिकार

जे लोक जलद खातात त्यांना इन्सुलिन प्रतिरोधक होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे रक्तातील साखर आणि इन्सुलिनची पातळी खालावत जाते. त्यामुळे मेटाबॉलिक समस्या वाढू लागतात. यामुळे हृदयविकाराचा धोकाही वाढत असतो.

पचनाशी संबंधित समस्या

जास्त वेळा खाल्ल्याने पचनाशी संबंधित समस्या निर्माण होतात. जेव्हा आपण जलद खातो तेव्हा आपण मोठे तुकडे उचलतो. ते पचवण्यासाठी पचनसंस्थेला खूप मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे अपचनाची तक्रार होऊ शकते आणि अन्नही उशिरा पचते.

खाल्ल्याचं समाधान वाटत नाही

जेव्हा तुम्ही पटकन अन्न खाता, तेव्हा तुमचे पोट अन्नाने भरले तरी तुमचे मन तृप्त होत नाही. यामुळे तुम्ही जेवण करूनही तृप्त होत नाही. यामुळेच काही लोक पोट भरूनही अन्न खातात. त्याचा परिणाम वजनावर दिसू लागतो आणि लठ्ठपणा वाढू लागतो.

टीप : वरील सर्व साम टीव्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून साम टीव्ही कोणताही दावा करत नाही.

Fast Eating Habit : तुम्ही अवघ्या १५ ते २० मिनिटात जेवण संपवतात? तुमच्या या सवयींमुळे येऊ शकतात अडचणी
Health Tips: तुम्हाला चांगलं आरोग्य जगायचं तर 'या' गोष्टी करा,नेहमी राहणार ठणठणीत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com