

अनेक लोक नवीन कपडे धुतल्या शिवाय वापरत नाहीत. मात्र अनेक वेळा नवीन कपड्यांचा पहिल्या धुण्यात रंग निघू लागल्याने आपल्याले पैसे वाया जातात. कपड्याचा रंग फिका पडतो. असे होऊ नये म्हणून 'हे' घरगुती उपाय वापरा.
नवीन कपडे धुवताना 'अशी' घ्या काळजी
नवीन कपडे पहिल्यांदा धुवताना जास्त वेळ पाण्यामध्ये ठेवू नये.
नवीन कपडे कधीही कोमट पाण्यामध्ये धुवावे. गरम पाण्याचा वापर केल्यास कपड्यांचा रंग निघून जातो.
कपडे धुतल्यावर पाणी गळण्यासाठी ठेवू नका. डायरेक्ट कपडे पिळून सुकायला ठेवा.
कपडे खरेदी करताना नेहमी त्याचा दर्जा तपासावा.
कपड्यांना साबण लावल्यावर ते आधी थंड पाण्यामध्ये घाला. यामुळे रंग जात नाही.
नवीन कपडे धुताना इतर कपड्यांसोबत टाकू नये. नाहीतर इतर कपड्यांना रंग लागू शकतो.
नवीन कपडे वॉशिंग मशीनमध्ये धुवायला टाकू नका. कारण जास्त रंग जाऊ शकतो.
नवीन कपडे धुवताना सौम्य डिटर्जंटचा वापर करा.
कपड्यांचा रंग जाऊ नये म्हणून घरगुती उपाय
व्हिनेगर
नवीन कपड्यांचा खूप रंग निघत असेल तर, व्हिनेगरमध्ये काही वेळ कपडे बुडवून ठेवा. त्यानंतर कपडे कोमट पाण्याने स्वच्छ करून घ्या.
मीठ
कोमट पाण्यामध्ये एक चमचा मीठ मिसळा आणि त्यात रंग जाणारे कपडे धुवा. कारण मीठ रंग स्थिर ठेवतो.
तुरटी
नवीन कपडे धुवताना पाण्यामध्ये तुरटी मिक्स करा आणि त्यात कपडे ३० मिनिटे भिजवून ठेवा. थोड्या वेळाने कपडे कोमट पाण्याने धुवा.
डिस्क्लेमर : ही फक्त सामान्य माहिती आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.