Cooking Tips : चपात्या तासनतास मऊ आणि लुसलुशीत राहण्यासाठी फॉलो करा या सोप्या टीप्स

secret tips to make soft and fluffy rotis : गरम-गरम चपात्या खाताना जितक्या छान लागतात, तितक्याच त्या थोड्या वेळानंतर कडक व रबरासारख्या होतात. पीठ मळण्यापासून ते भाजण्यापर्यंतच्या छोट्या चुका सुधारून तुम्ही रोज अगदी मऊ आणि टम्म फुगलेल्या चपात्या बनवू शकता.
MAKING SOFT AND FLUFFY CHAPATIS FOR HOURS EASY KITCHEN TIPS AND SECRETS
MAKING SOFT AND FLUFFY CHAPATIS FOR HOURS EASY KITCHEN TIPS AND SECRETSSAAM TV
Published On: 

आपण अनेकदा पाहतो की गरम-गरम चपात्या खाताना छान लागतात, पण थोड्या वेळानंतर त्या रबरासारख्या कडक होऊन जातात. याचे कारण पीठ मळण्यापासून ते तव्यावर भाजण्यापर्यंतच्या आपल्या काही छोट्या चुका असू शकतात. तुम्हीही काही सोप्या गोष्टींची काळजी घेऊन दररोज मऊ आणि टम्म फुगलेल्या चपात्या बनवू शकता

पीठ मळताना पाण्याचा योग्य वापर

पीठ मळताना थंड किंवा नेहमीच्या पाण्याच्या ऐवजी कोमट पाण्याचा वापर करा. यामुळे पिठातील ग्लुटेन सक्रिय होते आणि पिठात चांगला चिकटपणा येतो. पाणी एकदम ओतण्याऐवजी थोडे-थोडे करून टाका. पीठ चांगले मऊ होईपर्यंत ८ ते १० मिनिटे चांगले मळून घ्या.

MAKING SOFT AND FLUFFY CHAPATIS FOR HOURS EASY KITCHEN TIPS AND SECRETS
Diwali 2026 : दिवाळीच्या फराळात वापरला जाणारा खवा शुद्ध की भेसळयुक्त? कसे ओळखाल

पीठ मळल्यानंतर लगेच पोळ्या न लाटणे

पीठ मळताच लगेच चपात्या बनवायला सुरुवात करणे चुकीचे आहे. पीठ तयार झाल्यावर त्यावर अर्धा चमचा तेल किंवा तूप लावा आणि ओल्या सुती कापडाने झाकून २० ते ३० मिनिटांसाठी बाजूला ठेवा. यामुळे पीठ पाणी शोषून घेते आणि अधिक मऊ होते.

जास्त कोरड्या पिठाचा वापर टाळा

चपाती तव्याला चिकटू नये म्हणून बरेचजण त्यावर वारंवार कोरडे पीठ लावतात. पण जास्त कोरडे पीठ लावल्यामुळे पोळी भाजताना ती कोरडी होते आणि तिचा नैसर्गिक मऊपणा निघून जातो. शक्य तितके कमी कोरडे पीठ वापरा.

MAKING SOFT AND FLUFFY CHAPATIS FOR HOURS EASY KITCHEN TIPS AND SECRETS
Diwali 2026 : दिवाळीत फटाक्यांच्या धुरापासून डोळ्यांचे संरक्षण कसे करावे? लालसरपणा, वेदना किंवा डोळ्यांतून पाणी येण्याकडे दुर्लक्ष करू नका

तव्याचे योग्य तापमान

तवा नीट गरम होण्याआधीच त्यावर चपाती टाकल्यास ती कडक होऊ शकते. तवा मध्यम ते मोठ्या आचेवर व्यवस्थित गरम करा. चपातीवर छोटे बुडबुडे दिसू लागताच ती पलटी करा आणि दोन्ही बाजूंना हलके तांबूस डाग पडेपर्यंतच भाजून घ्या. पोळी वारंवार पलटी करू नका.

ओलावा टिकवून ठेवा

चपात्या भाजल्यानंतर त्यांना उघड्या प्लेटमध्ये ठेवू नका, त्या कोरड्या होऊन कडक होतात. पोळ्या तयार केल्यावर लगेचच त्यांना सुती कापडाने झाकून ठेवा, जेणेकरून वाफेमुळे त्यांचा मऊपणा टिकून राहील आणि त्या तासनतास लुसलुशीत राहतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.