महिलांच्या मराठमोळ्या साजशृंगारात साडी सर्वप्रथम येते. साडी नेसलेल्या महिला आणखी जास्त सुंदर दिसतात. काही सण समारंभ असल्यास महिला सुंदर साडी परिधान करतात आणि साजशृंगार करून सजतात. अशात साडी नेसल्यावर महिलांना काहीच काम करता येत नाही. मी साडी नेसली की वाकू कशी चालू कशी असे प्रश्न अनेक महिलांच्या मनात येतात.
साडीमध्ये प्रत्येकीला कंफर्टेबल वाटत नाही. त्यामुळे महिला साडी नेसल्यावर जास्त कामं करत नाहीत शिवाय आनंद व्यक्त करत त्यांना मनसोक्त नाचता देखील येत नाही. त्यामुळेच साडी नेसल्यावर महिलांनी कसे नाचायचे याची माहिती करिष्माने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केली आहे.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की तिने सुंदर हिरव्या रंगाची नऊवारी साडी नेसली आहे. यावर काँट्रासमध्ये तिने गुलाबी रंगाचा ब्लाऊज परिधान केलाय. तसेच केसांचा अंबाडा बांधून ती मिरवणुकीत मनसोक्त कसं नाचायचं हे स्वता नाचून दाखवत आहे.
साडीमध्ये पदर सर्वात महत्वाचा असतो. त्यामुळे तुमचा मिरवणुकीत किंवा वरातीत नाचण्याचा प्लान असेल तर पदर फ्लोइंग ठेवू नका. फ्लोईंग पदर असेल तर नाचताना तो मध्येच अडकतो किंवा आपलेच पाय एकमेकांत गुंततात. त्यामुळे नाचताना पदर नेहमी पिनअप करून घ्या.
साडी नेसली की आपली उंची जास्त दिसावी म्हणून काही महिला हिल्सच्या सँडल घालतात. मात्र असे केल्याने त्या नाचताना खाली पडू शकतात. किंवा पाय मुरगळणे अशा घटना घडू शकतात. त्यामुळे साडी नेसून नाचण्याचा प्लान असेल तर सँडल परिधान न करता फ्लॅट चपला वापरा.
साडी नसल्यावर बऱ्याच महिला केसांच्या विविध हेअर स्टाईल करतात. मात्र असे केल्याने केसांमध्ये जास्त यु पिन खोचल्या जातात. त्याने डोकं जड होतं शिवाय डोकं दुखू लागतं. त्यामुळे केसांचा सध्या आणि सिंपल आंबडा बांधा. तसेच केस मोकळे ठेवण्याची चूक करू नका. त्याने देखील तुम्हाला मिरवणूक किंवा वरातीमध्ये नीट नाचता येणार नाही.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.