Dance Viral Video: आजी-आजोबांचा ‘बटरफ्लाय’ गाण्यावर भन्नाट डान्स; स्टेप्स पाहून तरुण ही लाजतील; पहा VIDEO

Elders People Dance Video: सोशल मीडियावर काही दिवसांपासून व्हायरल होणाऱ्या एका प्रसिद्ध अशा ट्रेंडिग रिल्सवर काही आजी-आजोबा डान्स करत आहे.
Dance Viral Video
Dance Viral VideoSaam Digital
Published On

Butterfly Song Dance Video

सध्याचे विश्व डिजिटल होत आहे. प्रत्येक गोष्टींसाठी इंटरनेटचा वापर करताना व्यक्ती दिसतात तसेच जगाच्या कानाकोपऱ्यात घडलेला एक प्रसंग असेल तो काही क्षणातच जगभर समजतो. त्यातच सोशल मीडियावर असलेल्या गोष्टींचे अनेकजण मोठ्या प्रमाणात अनुकरण करताना आपल्याला दिसतात.(Viral Video)

त्यात सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात सोशल मीडियावर काही दिवसांपासून व्हायरल होणाऱ्या एका प्रसिद्ध अशा ट्रेंडिग रिल्सवर काही आजी-आजोबा डान्स करत आहे. सध्या यांच्या डान्सचा व्हिडिओ सध्या सर्वत्र पाहिला जात आहे.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सोशल मीडियावर काही व्हायरल होताच अनेक सामान्य व्यक्तींपासून सेलिब्रेटीज त्याचे अनुकरण करतात. त्यात कधी एखादे गाणे असेल किंवा डान्सच्या स्टेप्स असतील ते पाहून अनेकजण स्वत:चे रील्स बनवताता आणि सोशल मीडियावर व्हायरल करतात. त्यात काही दिवसांपासून सोशल मीडियावर 'बटरफ्लाय' या गाण्याची आणि या गाण्यावर केलेल्या स्टेप्सची सर्वत्र चर्चा होत आहे. अनेक व्यक्ती या गाण्यावर रिल्स बनवत आहेत. त्यातच या सर्वांनी बटरफ्लाय गाण्यावर डान्स करण्याचा मनमुराद आनंद लुटला आहे.

व्हायरल होत असेलल्या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की, काही वयस्कर व्यक्तींचा एक ग्रुप आहे. यांच्या ग्रुपमध्ये काही वयस्कर महिला आणि काही वयस्कर पुरुष आहेत. यात एक पांढऱ्या रंगाचा शर्ट परिधान केलेले व्यक्ती सर्वांच्या पुढे आहे आणि त्यांच्यापाठीमागे इतर सर्व उभे आहेत. यानंतर बटरफ्लाय गाणे सुरु होताच सर्वजण बटरफ्लाय गाण्याच्या स्टेप्स करत आहेत. सर्व शाळेतील मुलांसारखे डान्स करण्याचा आनंद घेत आहेत.

या सर्वांचा व्हिडिओ सोशल मीडिया इन्स्टाग्राम प्लॅटफॉर्मवरील @adaikkalam_free_oldage_home या इन्स्टा अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये 'बटरफ्लाय गाणं' असं लिहिलं आहे. व्हिडिओ व्हायरल होताच अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया केल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट बॉक्समध्ये लिहिले आहे की,'मस्तच,वय हा फक्त एक आकडा असतो' तर आणखी एका यूजरने लिहिले आहे की,'व्हिडिओ पाहून मन खूष झालं'.या सर्वांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओला लाखोंच्या घरात लाईक्स मिळाले असून मोठ्या प्रमाणात सोशल मीडिया यूजर्संचे व्ह्यूज मिळत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com