BP Control Tips: थंडीत बीपी वाढतोय? नियंत्रणात ठेवण्यासाठी हे उपाय ठरतील फायद्याचे

Winter Tips: थंडीत रक्तवाहिन्या आकुंचन पावल्याने रक्तदाब वाढण्याची शक्यता जास्त असते. व्यायाम, योग्य आहार, मीठ कमी घेणे, धूम्रपान-मद्यपान टाळणे आणि पुरेसं पाणी पिणे बीपी नियंत्रणात मदत करतं.
cold weather BP rise
winter blood pressuregoogle
Published On

थंडी सुरू होताच अनेकांना रक्तदाब वाढण्याची समस्या जाणवते. तापमान कमी झाल्यावर शरीरातल्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्याला व्हॅसो-कन्स्ट्रिक्शन म्हणतात. याने रक्तप्रवाहावर दबाव वाढतो आणि हृदयाला जास्त शक्तीने पंप करावं लागतं. त्यामुळे रक्तदाब नॅचरली वाढण्याची शक्यता जास्त जास्त असते.

अनेकदा या दिवसांमध्ये लोक कमी हालचाल करतात, व्यायाम कमी होतो, दिवस लहान असल्याने घरातच बसण्याचा वेळ जास्त मिळतो. याशिवाय, हिवाळ्यात सण-उत्सवाच्या काळात तेलकट, खारट आणि जास्त मीठ असलेल्या पदार्थांचे सेवनही वाढतं. या सर्व गोष्टींचा थेट परिणाम रक्तदाबावर परिणाम होतो.

थंडीत व्यायाम करण्याचे फायदे

बीपी नियंत्रित ठेवण्यासाठी थंडीत सर्वप्रथम आपली शारीरिक हालचाल कायम ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. थंडीमुळे बाहेर व्यायाम करायला आळस येतो. अशावेळेस तुम्ही घरात ट्रेडमिल, योगा, स्ट्रेचिंग किंवा ऑनलाइन वर्कआउट्सचा वापर करू शकता. व्यायामामुळे रक्तवाहिन्यांची लवचिकता टिकून राहते आणि रक्तप्रवाह सुरळीत राहतो. वजन वाढणार नाही याकडे लक्ष दिल्यानेही बीपी नियंत्रणात राहण्यास मदत होते.

थंडीत कोणता आहार घ्यावा?

आहाराबाबतही विशेष काळजी आवश्यक आहे. हिवाळ्यात आहारात ताज्या भाज्या, हिरव्या पालेभाज्या, फळे, संपूर्ण धान्य, प्रथिने यांचा समावेश वाढवावा. पालक, गाजर, संत्री यांसारखी हंगामी फळे-पालेभाज्या शरीराला पोटॅशियम आणि मॅग्नेशियम देतात. ज्यामुळे रक्तदाब संतुलित राहण्यास मदत होते. मीठाचे सेवन मात्र नियंत्रित ठेवणं गरजेचं आहे, कारण जास्त मीठ रक्तदाब वाढवतं.

या सवयी टाळा

धूम्रपान पूर्णपणे टाळा आणि मद्यपान कमी करावे. धूम्रपानामुळे रक्तवाहिन्या जास्त आकुंचन पावतात, ज्यामुळे बीपी अचानक वाढण्याची शक्यता असते. मद्यपानही तात्पुरता रक्तदाब वाढवतं, त्यामुळे तेही नियंत्रित ठेवणं गरजेचं आहे. हिवाळ्यात पाणी कमी प्यायची सवय अनेकांना असते, मात्र पाण्याचे सेवन कमी झाल्याने ते रक्त घट्ट होते आणि रक्तदाब वाढतो. त्यामुळे नियमित पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे. थंडीपासून शरीराला उबदार ठेवणे हेही रक्तदाब नियंत्रणाचे एक महत्त्वाचे पाऊल आहे.

cold weather BP rise
kidney Health Diet: किडनीचा त्रास असणाऱ्यांनी कोणते पदार्थ खाऊ नयेत?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com