Cyber Scam: ऑनलाईन फसवणुक झालीय? लगेच 'या' क्रमांकावर किंवा पोर्टलवर करा घरबसल्या तक्रार

Cyber Scam Complaint: सध्या सायबर गुन्ह्यांचं प्रमाण वाढलं आहे. कोणीही सायबर गुन्ह्यांना बळी पडू शकतं. अशी फसवणूक झाल्यास तक्रार कशी करायची ते जाणून घेऊ या.
Cyber Scam
Cyber ScamSaam Tv
Published On

How To Complaint Cyber Scam

सायबर स्कॅमने (Cyber Scam) आज सगळ्यांनाच वैतागून सोडलं आहे. सायबर गुन्हेगार २४ तास सक्रीय असतात. आपल्याला कधीही ते फसवू शकतात. अशा परिस्थितीत अनेक वेळा आपली परिस्थिती अशी असते की, झालेल्या घोटाळ्याची तक्रार आपण लगेच करू शकत नाही, त्याचा फायदा घेऊन सायबर गुन्हेगार कायद्याच्या आवाक्याबाहेर पोहोचतात. मग आपल्याकडे पोलिसांशिवाय दुसरा पर्याय नसतो.  (Latest Crime News)

ऑनलाईन फसवणूक झाल्यानंतर काय करायचं, असा प्रश्न नेहमी आपल्यासमोर असतो. अशा सायबर घोटाळ्याची तक्रार करण्याचा सोपा मार्ग आपण जाणून घेऊ (How To Complaint Cyber Scam) या. घरबसल्या २४ तासांत कधीही आता आपल्याला सायबर गुन्ह्यांची तक्रार दाखल करता येणार आहे. ज्यामध्ये स्कॅन केल्यानंतर आपण लगेच तक्रार नोंदवू शकतो. ही तक्रार 24 तासांच्या आत सकाळी, संध्याकाळी किंवा रात्री कधीही नोंदवू शकतो. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोर्टलवर तक्रार करा

सायबर गुन्हे रोखण्यासाठी सरकार प्रयत्न करत (Cyber Scam Complaint) आहे. याबाबत तक्रार करण्यासाठी सरकारने एक पोर्टल सुरू केलं आहे. जिथे आपण दिवसाचे २४ तास आणि आठवड्याचे ७ दिवस कधीही तक्रार नोंदवू शकतो. यासाठी आपल्याला www.cybercrime.gov.in वर लॉग इन करावं लागेल. येथे तक्रार नोंदवल्यानंतर तक्रारीचा मागोवा घेण्यासाठी एक नंबर दिला जातो. ज्याद्वारे आपण तक्रारीचा मागोवा घेऊ शकतो.

हेल्पलाइन क्रमांक

आपण 155260 वर कॉल करून सायबर क्राईम हेल्पलाइनशी (portal and helpline number) संपर्क साधू शकतो. ही हेल्पलाइन २४×७ उपलब्ध आहे. सायबर गुन्ह्याची तक्रार दाखल करण्यास हा क्रमांक मदत करतो. यासोबतच आपण आपल्या जिल्ह्यातील सायबर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवू शकतो.

Cyber Scam
Mumbai Cyber Crime: सायबर सिटीत सायबर गुन्ह्यांची स्थिती काय? खुद्द पोलीस आयुक्तांनीच दिली माहिती

सायबर गुन्हे रोखण्यासाठी सरकार प्रयत्नशील

सायबर घोटाळे (cyber crime) टाळण्यासाठी सतर्क राहणं आणि खबरदारी घेणं महत्त्वाचं आहे. आपण जागरूक आणि सतर्क राहिल्यास सायबर गुन्हेगारांचे बळी होण्यापासून वाचू शकतो. यासोबतच, कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवू नये आणि कोणताही QR कोड स्कॅन करू नये.

सायबर गुन्हेगार आपली ऑनलाईन (Cyber Scam News) फसवणूक करतात. आपल्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळतात. अनेकदा हे गुन्हे अतिशय भीषण स्वरूपाचे असतात. सायबर क्राईम रोखण्यासाठी सरकार देखील प्रयत्नशील आहे. सरकार नागरिकांमध्ये याबाबत मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.

Cyber Scam
Cyber Scam: भारतीय लोकांना दररोज येतात १२ फेक मेसेज; दर ११ सेकंदात तयार होते एक Scam साईट्स

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com